Viral Video  Saam TV
व्हायरल न्यूज

Viral Video : बापरे! महिलेच्या गळ्यात चक्क किंग कोब्रा साप; पुढे जे घडलं ते पाहून तुमच्या अंगावर सुद्धा काटा येईल

Snake Video Viral : प्रत्येक व्यक्ती व्हायरल होण्यासाठी आजकाल मोठमोठे स्टंट करत आहे. यात कधी कोणी वघासोबत फोटोशूट करत आहे. तर कोणी साप किंवा किंग कोब्रा अशा विषारी सापासोबत सुद्धा फोटोशूट करत आहेत.

Ruchika Jadhav

सोशल मीडियावर हिट, फेमस आणि व्हायरल होण्यासाठी कोण कधी काय करेल याचा काहीच नेम नाही. प्रत्येक व्यक्ती व्हायरल होण्यासाठी आजकाल मोठमोठे स्टंट करत आहेत. यात कधी कोणी वघासोबत फोटोशूट करत आहे. तर कोणी साप किंवा किंग कोब्रा अशा विषारी सापांसोबत सुद्धा फोटोशूट करत आहेत.

सध्या सोशल मीडियावर असाच एक काळजात धस्स करणारा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. कारण एका व्यक्तीने त्याच्या पत्नीच्या गळ्यात थेट किंग कोब्रा साप सोडून दिला आहे. गळ्यात साप आल्याने महिला देखील चांगलीच घाबरली आहे.

या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक जोडपं हिंस्त्र आणि सरपटणाऱ्या प्राण्यांच्या एका पार्कमध्ये आले आहेत. या ठिकाणी सर्व पाळलेले साप आणि हिंस्त्र प्राणी आहेत. येथे आल्यावर या महिलेला किंग कोब्राला हातात घ्यावं वाटतं. त्यामुळे येथील व्यक्ती साप थेट तिच्या गळ्यात सोडून देतात. गळ्यात साप आल्याने ही महिला आधी एकदम स्तब्ध उभी राहते.

सुरुवातीला सापाचं तोंड मागे असतं. मात्र नंतर साप फिरत फिरत पुढे येतो आणि महिलेच्या मानेजवळ थांबतो. त्यानंतर हा खतरनाक किंग कोब्रा येट या महिलेच्या तोंडाजवळ येऊन थांबतो. आता साप आपल्याला दंश करणार असं तिला वाटतं. त्यामुळे ही महिला घाबरते आणि मोठमोठ्याने ओरडू लागते.

महिलेचा हा व्हिडिओ एका व्यक्तीने आपल्या फोनमध्ये कैद केला आहे. व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. यावर अनेक मजेशीर कमेंट सुद्धा आल्या आहेत. व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांच्या मनात सुद्धा धडकी भरली आहे.

सध्या अनेक व्यक्तींना हिंस्त्र प्राण्यांना पाहण्याची इच्छा होते. वाघ, सिंह, साप असे विविध प्राणी अगदी जवळून पहावेत असं अनेकांना वाटतं. त्यामुळे अनेक व्यक्ती व्याघ्र प्रकल्पाला सुद्धा भेट देतात. आता पाळलेले हिंस्त्र प्राणी छडीच्या भीतीने जे सांगितलं जाईल ते ऐकतात आणि तसं वागतात. मात्र तसे असले तरी हिंस्त्र प्राणी हाताळणे म्हणजे फार मोठी रिस्क आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मतदानाच्या आदल्यादिवशी EVMमध्ये छेडछाड? शिंदे सेनेच्या आरोपाने राजकीय वर्तुळात खळबळ

Eyebrow Shaping Tips: घरच्या घरी करा परफेक्ट आयब्रो! पार्लरशिवाय सुंदर शेप मिळवण्यासाठी 2 सोप्या ट्रिक्स

Maharashtra Politics: शिंदेसेनेला मुंबईत फक्त 56 जागा? भाजपनं केली शिंदेसेनेची कोंडी?

Maharashtra Live News Update: कणकवली घोणसरीत मादी बिबट्याला केले जेरबंद

ठाकरेचं ठरलं, जागांवर अडलं? युतीच्या घोषणेला जागावाटपाचा अडसर?

SCROLL FOR NEXT