व्हायरल न्यूज

Viral News: बालवाडी की इंजिनिअरींग! KG Nursery ची फी पाहून नेटकऱ्यांचे डोळे चक्रावले

nursery school Fees : नर्सरीचं फी पाहून नेटकरी चक्रावले आहेत. फी पावती सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

Bharat Jadhav

सध्या सोशल मीडियावर बालवाडीची एक फी पावती खूप व्हायरल होत आहे. ही पावती पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्याचं कारण म्हणजे नर्सरीची फी. ही फी नर्सरीची की इंजिनिअरींगची, असा प्रश्नदेखील नेटकऱ्यांना पडलाय. एका वेळच्या पालक मिटिंगसाठी तब्बल ८४०० रुपयांची फी आकारण्यात आलीय. तर प्रवेश शुल्क ५५,६०० रुपये आकारण्यात आलाय. आता ही फी पाहून तुम्हाला वाटेल ही फी एखाद्या इंजिनिअरिंगची कॉलेजची असेन परंतु ही फी ज्युनिअर केजीची आहे. फी पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

"रु. ८,४०० पालक मिटिंगची फी! कोणताही पालक डॉक्टर तपासणीसाठी यातून २० टक्के पैसे देण्यास देखील तयार होणार नाही," डॉ जगदीश चतुर्वेदी, एक ईएनटी सर्जन, यांनी X वर लिहिले की, "मी आता शाळा उघडण्याचा विचार करत आहे." त्यांच्या या पोस्टला जवळपास ६७,००० व्ह्यूज मिळालेत. त्यांच्या या पोस्टवर प्रतिक्रिया देतांना ऑन्कोलॉजिस्ट डॉ. विनीत गोविंदा गुप्ता म्हणाले, लोक त्यांच्यावर कधीच खर्च केला नसेल तर तितका खर्च आपल्या मुलांवर करतात.

त्यामुळेच महागडे कोचिंग सेंटर, शाळा, महाविद्यालये वेड्यासारखे वाढत आहेत. त्यावर एक युझर जितेन एस (@a_jiten) म्हणाले, "रु. ५५००० प्रवेश शुल्क! ते काय आयव्ही लीग प्रीस्कूलमध्ये प्रवेश घेत आहेत का? "मी माझं इंजिनिअरींग यापेक्षा कमी पैशात पूर्ण केलं!" असं सुयोग व्यवहारे म्हणालेत. (@suyogvyawahare) तर सौमेंदू मुखर्जी (@SoumenduM) म्हणाले, "आमच्या आणि मुलांच्या काळात भाग्यवान होतो. २०२४-२५ या शैक्षणिक वर्षासाठी त्याला २ लाख रुपयांपेक्षा जास्त शिक्षण शुल्क भरावे लागल्याचं एक युझर म्हणाला.

गुरग्राममधील एक जण म्हणाले की, त्यांनी त्यांच्या तीन वर्षाच्या मुलाच्या एका महिन्याची फी ३०,००० रुपये भरले. त्यात शाळेकडून कोणतचं स्पष्टीकरण किंवा माहिती दिली पाहिजे. तर एकजण म्हणाला की, जर सीबीएसईने दरवर्षी १० टक्क्यांनी फी वाढवली तर त्यांना त्यांचा मुलगा १२ वीला जाईपर्यंत ९ लाख रुपये भरावे लागतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शेतकऱ्यांना ड्रोन, शेततळे, सुविधा केंद्र, बीबीएफ यंत्रासाठी अनुदान मिळणार; कृषीमंत्र्यांची मोठी घोषणा

Maharashtra Politics: ऐन निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरेंना मोठा धक्का; निष्ठावंत नेत्यानं सोडली साथ

Maharashtra Live News Update: मुद्रांक शुल्क आणि त्यावरचा दंड भरल्यावरच व्यवहार पूर्णपणे रद्द होणार

Manoj Jarange: जरांगेंच्या हत्येचा कट? एक-दोन नव्हे, तीन-तीन प्लान आले समोर

रेल्वेचे खुनी कर्मचारी,आठ प्रवाशांचे हत्यारे मोकाट, माजुरड्या कर्मचा-यांवर कारवाई कधी?

SCROLL FOR NEXT