Khel Paithanicha Viral Video Saam TV
व्हायरल न्यूज

Khel Paithanicha Viral Video : पैठणीचा खेळ रंगला; जिंकण्यासाठी दोन वहिनी स्टेजवर भिडल्या, कुस्तीचा VIDEO व्हायरल

Two Women Fighting for Pathani : मानाची पैठणी मिळवणे साधी गोष्ट नाही. त्यासाठी महिलांना या कार्यक्रमात अनेक खेळ खेळावे लागतात. साध्या साध्या खेळातून त्यांना पहिला नंबर पटकवायचा असतो.

Ruchika Jadhav

महिलांचे त्यांच्या अलंकारावर आणि साड्यांवर विशेष प्रेम असते. साड्यांमध्ये पैठणी साडी म्हटलं की, महिलांसाठी अगदीच जिव्हाळ्याचा विषय. पैठणीमधील सर्वात सुंदर साडी विकत घेण्यासाठी महिला काय करतील आणि काय नाही याचाही काही नेम नाही. अशात सोशल मीडियावर पैठणी जिंकण्यासाठी दोन वहिनी एकमेकींना भिडलेल्या दिसत आहेत.

खेळ पैठणीचा आता सर्वत्र पोहचला आहे. या खेळात विजय मिळवावा आणि भाऊजींकडून मानाची पैठणी कशी मिळावी यासाठी अनेक महिला यात सहभाग घेतात. आता मानाची पैठणी मिळवणे साधी गोष्ट नाही. त्यासाठी महिलांना या कार्यक्रमात अनेक खेळ खेळावे लागतात. साध्या साध्या खेळातून त्यांना पहिला नंबर पटकवायचा असतो. त्यामुळे महिला एकमेकींना भिडतात आणि नंबर मिळवतात.

आता कुणाला हरवायचे म्हणजे तेही कठीण काम आहे. त्यामुळे या खेळात फार गंमती जमती होतात. त्यातीलच एक व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, दोन्ही वहिनी एकमेकींना हरवण्याचा प्रयत्न करत आहेत.

व्हिडिओमध्ये दिसत आहे की, पैठणीच्या खेळात दोघींच्या हातात एक एक फुगा दिला आहे. जिचा फुगा शेवटपर्यंत उरेल तिला पैठणी मिळणार असा हा खेळ आहे. त्यामुळे दोघीही एकमेककींना हरविण्याचा प्रयत्न करतात. आपला फुगा वाचवण्यासाठी आणि समोरच्या महिलेचा फुगा फोडण्यासाठी दोघींमध्ये चांगलीच कुस्त्ती रंगते.

सोशल मीडियावर @newhomeminister या इंस्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. आता हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. वहिनींच्या या कुस्तीच्या व्हिडिओला लाखोंच्या घरात व्हूव्ज मिळाले आहेत. नेटकऱ्यांनी देखील या व्हिडिओवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. सदर व्हिडिओ जतमधील असल्याचे समजले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हिंगणघाट येथे आगमन

Municipal Corporation Election: मुंबई, पुण्यासह राज्यातील महानगरपालिकांच्या निवडणुका कधी होणार?

गगनचुंबी ८ इमारतींचा कोळसा; आगीत १२८ जणांचा होरपळून अंत, मृतांचा आकडा वाढण्याची भीती

MNS Prakash Bhoir : इंजिन सोडून कमळाकडे धरली वाट! बड्या नेत्याने सोडली राज ठाकरेंची साथ

Ragi Chocolate Cookies Recipe: संध्याकाळी लागलेल्या भूकेसाठी घरच्या घरी बनवा हेल्दी आणि टेस्टी रागी चॉकलेट कुकीज

SCROLL FOR NEXT