Wedding Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Wedding Video: RCBचा कट्टर फॅन! लग्न सोडून नवरदेवाने पाहिला सामना; चषका जिंकताच आनंद गगणात मावेना; पाहा व्हिडिओ

Indian Wedding Viral Video: सोशल मीडियावर सध्या भारतीय लग्नातील एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. जिथे काल झालेला क्रिकेटचा सामना पाहण्यासाठी एका नवरदेवाने लग्नच थांबवलं आहे. या लग्नाची चर्चा सध्या सर्वत्र होत आहे.

Tanvi Pol

Cricket Fans Video: तब्बल १८ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर RCBने काल IPL चषक जिंकला! या ऐतिहासिक विजयाचा आनंद एका RCBच्या कट्टर चाहत्याने इतका जबरदस्त पद्धतीने साजरा केला की त्याने अगदी आपल्या लग्नाचा कार्यक्रमही तात्पुरता थांबवला. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.

व्हिडिओची सोशल मीडियावर तुफान चर्चा

लग्नाचे(Wedding) विधी सुरु झाले होते आणि लग्नात आलेल्या पाहुण्यांसाठी आणि नवरदेवासाठी मॅचचे स्क्रिनीगं करण्यात आले होते. त्याच वेळी मॅच अंतिम टप्प्यात आली होती. मग काय सामना पाहण्यासाठी नवरदेवाने विधी काही वेळ बाजूला सारत मॅच पाहण्यासाठी उठला. ज्या क्षणी RCBने विजयी चषक जिंकला, तेव्हा त्याचा आनंद अगदी गगनात मावेला. तब्बल १८ वर्षांच्या थांबीनंतर हा विजय नक्कीच सर्वांसाठी अविस्मरणीय ठरला आहे.

लग्नातील नवरदेवाचा हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या एक्सवरील @nikchillz या अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला आहे. त्यानंतर तो इन्स्टाग्रा, फेसबूक आणि अन्य प्रसिद्ध माध्यमांवरही शेअर होत आहे. आतापर्यंत नेटकऱ्यांनी अनेक लाईक्स आणि व्ह्यूज या व्हिडिओला दिलेले आहेत.

व्हिडिओ(Video) नेटकऱ्यांना एवढा आवडला की, अनेकांनी मजेशीर प्रतिक्रिया देखील दिलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने कमेंट केली,''मी असती तर नवरदेवाला जाम मारल असतं'' तर अजून एका यूजरने म्हटलं की,''पागल झाला तो'' तिसऱ्या यूजरने म्हटलं,''वाचला नवरदेव नाही तर नवरीने जाम हाणलं असतं'' अशा मजेशीर प्रतिक्रिया दिलेल्या आहेत.

टीप: लग्नातील हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Karjat Muslim Township: मुंबईजवळ मुस्लिम टाऊनशिप वादात; मानवाधिकार आयोगाची सरकारला नोटीस

Hill Station: शांत वातावरण अन् सुंदर निसर्ग, स्वर्गाहूनी सुंदर 'हे' हिल स्टेशन पाहून मनाला पडेल भुरळ

TET Exam: टीईटी नापास शिक्षकांची नोकरी जाणार; दोन लाख शिक्षकांची चिंता वाढली

Crime News: नशेनं घेतला जीव; दारू पिण्यासाठी मागितले पैसे, बायकोनं नकार देताच डोक्यात घातली हातोडी, नाशिकमध्ये खळबळ

Maharashtra Politics : शरद पवार गटाला मोठा झटका, बड्या नेत्यानं असंख्य समर्थकांसह हाती घेतलं 'भाजप'चं कमळ

SCROLL FOR NEXT