Kalyan Video Saam TV
व्हायरल न्यूज

Kalyan Video: कल्याण ट्रॅफिक पोलीस ऑफिसमध्ये भलामोठा साप; नागरिकांची पळापळ, पाहा VIDEO

Snake Video: या सापाचा सुखरूप बचाव केल्यानंतर त्याला लवकरच वनविभागच्या मार्गदर्शनाखाली निसर्गमुक्त करण्यात येईल असे प्राणी मित्रांनी सांगितले.

Ruchika Jadhav

अभिजित देशमुख

Kalyan Viral Video:

कल्याण पश्चिमेकडे स्टेशनजवळ असलेल्या शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या कार्यालयात एक भला मोठा साप आढळलाय. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. साप दिसताच तेथे पोलिसांसह बघ्यांची मोठी गर्दी जमली होती.

घटनेची माहिती मिळताच प्राणिमित्रांना मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि सापाला पकडले. हा साप धामण जातीचा बिनविषारी साप आहे. या सापाचा सुखरूप बचाव केल्यानंतर त्याला लवकरच वनविभागच्या मार्गदर्शनाखाली निसर्गमुक्त करण्यात येईल असे प्राणी मित्रांनी सांगितले.

सोशल मीडियावर आजवर सापाचे अनेक व्हिडीओ व्हायरल झालेत. साप दिसल्यावर अनेक व्यक्ती त्याच्यापासून स्वत:चा बचाव करण्यासाठी लांब पळतात किंवा त्यावर हल्ला करतात. काही दिवसांपूर्वी अशीच एक घटना मुंबईत घडली होती.

मुंबईतील एक सोसायटीमध्ये साप आढळला होता. साप दिसल्यावर एक महिलेने त्यावर हल्ला केला. महिलेने हल्ला केल्यावर सापाचा मृत्यू झाला. प्राणी मित्रांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी वन विभागाकडे तक्रार केली. त्यानंतर सोसायटीचे सीसीटीव्ही फुटेज चेक करण्यात आले होते. या प्रकरणी सदर महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Datiya Bypoll : निवडणुकीत पराभव होताच भाजपचा मोठा निर्णय; अख्खी कार्यकारिणी बरखास्त, पक्षात खळबळ

Maharashtra News Live Update: मुंबई गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी

संध्याकाळी टाईमपास खायला बनवा क्रिस्पी मखाना चिवडा; रेसिपी आहे एकदम सोपी

Thursday Horoscope: घरातले वातावरण आनंद राहील; 8 राशींच्या व्यक्तींची भरभराट होणार, वाचा उद्याचे राशीभविष्य

Fatty Liver Disease: पायांमध्ये ही 3 महत्त्वाची लक्षणं दिसली तर समजा लिव्हरवर चरबी साचलीये!

SCROLL FOR NEXT