Justice For Chikki Saam TV
व्हायरल न्यूज

Justice For Chikki: चिक्कीला न्याय मिळालाच पाहिजे...! चाट रेसिपीचा VIDEO पाहून तुमचाही संताप होईल

Justice For Chikki Viral Video: आयस्क्रीम चाय, पान चाय, चिकन मॅगी, थम्सअप पराठा असे अनेक विचित्र काँबिनेशन असलेले पदार्थ सोशल मीडियावर पाहायला मिळालेत. या लोकांनी सर्व काही ट्राय केल्यावर आता चिक्कीला देखील सोडलेलं नाही.

Ruchika Jadhav

Viral Video:

हिवाळा आला की अनेकांना गुळ आणि शेंगदाण्यांची स्वादिष्ट चिक्की खावी वाटते. आरोग्यासाठी पौष्टीक असलेली ही चिक्की सर्वजण आवडीने खातात. तुम्हाला देखील गुळ, शेंगदाणे, तिळ, चणे मिक्स असलेली चिक्की आवडत असेल. मात्र या चिक्कीला पाणीपुरी चाट बणवून तुम्हाला खाण्यासाठी दिलं तर? कुणालाच हे आवडणार नाही. मात्र सोशल मीडियावर अशाच चाटचा व्हिडीओ समोर आलाय.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सोशल मीडियावर नेहमीच स्वादिष्ट पदार्थ आणि रेसिपीचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडीओ पाहून अनेकांच्या तोंडाला पाणी सुटतं. तर बऱ्याच व्हिडीओ डोक्याला संताप देणाऱ्या असतात. आयस्क्रीम चहा, पान चहा, चिकन मॅगी, थम्सअप पराठा असे अनेक विचित्र काँबिनेशन असलेले पदार्थ सोशल मीडियावर पाहायला मिळालेत. या लोकांनी सर्व काही ट्राय केल्यावर आता चिक्कीला देखील सोडलेलं नाही.

चिक्की चाटचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती पाणीपुरी चाट सरखी चिक्की चाट बनवत आहे. यावेळी त्याने गुळ शेंगदाणा चिक्कीचे चौकोनी भाग केलेत. त्यावर लाल आणि हिरवी चटणी टाकलीये. यानंतर चिक्कीवर बारीक पिवळी शेव, कांदा, डाळींब टाकण्यात आलंय. चाट मसाला आणि मिठ टाकून ही डीश तयार करण्यात आली आहे.

नेटकरी हा व्हिडीओ पाहून चांगलेच भडकलेत आहेत. चिक्कीला न्याय मिळाच पाहिजे असं म्हणत अनेकांनी कमेंटमधून संताप व्यक्त केलाय. पौष्टिक पदार्थाची चव आणि त्यातील पौष्टिकपणा कमी कसा करायचा याचं हे उदाहरण आहे, असं एकाने कमेंटमध्ये लिहिलंय. यांचं सर्वकाही चालत असेल तर हे काहीही करतील, चिक्की आणि माझ्या डोळ्यांना न्याय द्या, अशा कमेंट्स काहींनी केल्यात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shiv Thakare : बिग बॉस विजेता शिव ठाकरेने गुपचूप बांधली लग्नगाठ; 'तो' फोटो शेअर करून चाहत्यांना दिली गुडन्यूज

PM Kisan Yojana: शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, ₹२००० साठी आताच करा हे काम, अन्यथा २२वा हप्ता विसरा

Maharashtra Live News Update : अजित पवारांचं देवेंद्र फडणवीस यांना शायरीतून प्रत्युत्तर

ZP Elections : मिनी विधानसभेचं बिगुल वाजणार, दोन की एकाच एकाच टप्प्यात निवडणूक? वाचा लेटेस्ट अपडेट

Maharashtra Politics: अजितदादांचा पुणेकरांसाठी मोठा वादा, देवेंद्र फडणीस म्हणाले - 'घोषणा करायला आपल्या बापाचं काय जातं'

SCROLL FOR NEXT