Jugaad Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Jugaad Viral Video: अनोखा जुगाड! सायकलला कारचे स्टेअरिंग, विद्यार्थ्याच्या भन्नाट सायकलचा VIDEO व्हायरल

Viral Video: सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. सोशल मीडियावर नुकताच एका शाळेतील मुलाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यात एका मुलाने सायकलला कारचे स्टेअरिंग लावले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Jugaad Viral Video Of a Boy Placing Car Steering On Cycle:

सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यात अनेक लोक जुगाड करुन वेगवेगळ्या वस्तू बनवतात. आपले काम सोपे व्हावे यासाठी अनेक जुगाड करतात. असाच एक जुगाड एका शाळेतील मुलाने केला आहे. एका शालेय मुलाने चक्क सायकललाच चारचाकीचे स्टेयरिंग बसवले आहे. याचाच व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

व्हायरल व्हिडिओत सायकलला हँडल नसून चारचाकी वाहनाचे स्टेअरिंग बसवले आहे. हा अनोख जुगाड शालेय विद्यार्थ्याने केला आहे. (Latest Viral News In Marathi)

व्हायरल व्हिडिओत एका शाळेतील मुलगा सायकलवरुन जाताना दिसत आहे. या मुलाची सायकल ही एकदम अनोखी आहे. या सायकलला दोन हँडल नसून स्टेअरिंग आहे. हे स्टेअरिंग वापरुन हा मुलगा सायकल चालवताना दिसत आहे. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

वाहनाचे स्टेअरिंग लावून हा मुलगा सायकल कशी चालवू शकतो, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. हे असे जुगाड केल्याने मुलाच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. परंतु सायकलला स्टेअरिंग लावून हा मुलगा सायकल कशी चालवतो याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

arvinfkashyap7364 या सोशल मीडिया अकाउंटवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. हा जुगाड एखाद्या दिवशी महागात पडेल, असा जुगाड करणे खूप जास्त धोकादायक आहे, अशा कमेंट्स या व्हिडिओवर आल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manoj Jarange Patil: ...तर सरकारचा माज उतरवलाच पाहिजे; मनोज जरांगे पाटील कडाडले

Uddhav Thackeray: राजीनाम्यानं चालणार नाही, तर सरकार बदला; जंतर मंतरवरून उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

कार अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू; दुचाकीस्वाराला वाचवताना अनर्थ घडला!

राहुल-प्रियंका गांधींना 3 तासांनी पोलिसांनी सोडलं; सुटकेनंतरचा पहिला व्हिडिओ

Fact Check: देशातल्या पहिल्या हायड्रोजन ट्रेनवर दगडफेक? CJP समर्थकांकडून हायड्रोजन ट्रेन टार्गेट?

SCROLL FOR NEXT