Dog Attack  Saam Tv
व्हायरल न्यूज

Dog Attack: हात जबड्यात पकडून जमिनीवर आपटलं, पिटबुल कुत्र्याचा महिलेवर हल्ला; थरकाप उडवणारा

Pitbull Dog Attack Woman : उत्तरप्रदेशच्या झांसीत पाळीव पिटबुल कुत्र्याने महिलेवर भीषण हल्ला केला. महिलेचा हात कुत्र्याने जबड्यात पकडला आणि तिला खाली फेकले. आरडाओरड ऐकून स्थानिकांनी तिला वाचवले.

Manasvi Choudhary

उत्तरप्रदेशच्या झांसी येथे एका पाळीव पिटबुल कुत्र्‍याने हल्ला केल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. कुत्र्‍याने एका महिलेवर हल्ला केला आहे. महिलेचा हात कुत्र्‍याने जबड्यात धरला आणि तिला खाली फेकून दिले. महिलेने आरडा- ओरडा केल्यानंतर घरमालक आणि स्थानिक लोकांच्या मदतीने महिला थोडक्यात बचावली आहे . बऱ्याच वेळच्या संघर्षानंतर महिलेला कुत्र्याच्या तावडीतून सोडवण्यात यश आलं आहे. सध्या सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

पाळीव प्राणी हे जितकेच प्रेमळ असतात तितकेच हिसंक असतात. अनेकदा पाळीव प्राण्याच्या हल्ल्याच्या घटना घडल्या आहेत. पाळीव प्राण्यांनी मानवी वस्तीवर हल्ला केला आहे. अशातच नुकत्याच घडलेल्या या घटनेत महिला देखील गंभीररित्या जखमी झाली आहे.

शनिवारी रात्रीच्या सुमारास एक महिला आपल्या मैत्रिणीकडे आली. मात्र बाहेर जात असताना अचानक पाळीव पिटबुल कुत्र्‍याने तिच्यावर हल्ला केला ज्यामुळे ती गंभीर जखमी झाली आहे. महिलेने आरडा ओरड केल्यानंतर तेथे घरमालक आणि बरेच लोक जमले आहेत. तरीही कुत्रा घाबरला नाही त्या महिलेला वाचवण्यासाठी आलेल्या घरमालकाच्या मुलीवर देखील कुत्र्याने हल्ला केला आहे.

व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, की एका कुत्र्‍याने एका महिलेचा पाठलाग केला आहे. त्याने महिलेचा हात तोंडात धरला आहे. महिला जोरजोरात ओरडताना दिसत आहे. दरम्यान घरमालक देखील तेथे येतो तिला कुत्र्‍याच्या तावडीतून सोडवण्याचा प्रयत्न करतो आहे. पण कुत्र्‍याच्या जबड्यातून तिचा हात सोडवू शकत नाही. दरम्यान महिला जमिनीवर पडते आणि स्वत:ला वाचवण्यासाठी ओरडते आहे. हे सर्व ऐकून तेथील लोक धावतात. मात्र तरीही कुत्रा महिलेचा हात सोडत नाही. बराच संघर्षानंतर कसा तरी महिलेचा हात कुत्र्‍याच्या जबड्यापासून वेगळा होतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhiwandi Accident: देवदर्शनावरून घरी परतताना काळाचा घाला; मुंबई-नाशिक महामार्गावर दुचाकीचा अपघात, बापलेकीचा मृत्यू

Leopard Attack: मैत्रीला जागला...! बिबट्याचा कुत्र्यावर हल्ला, श्वानाच्या निडर मैत्रीसमोर बिबट्याची माघार Video Viral

IPS Anjana Krishna: आधी वाद नंतर अजितदादांची स्पष्टीकरणाची पोस्ट; उपमुख्यमंत्र्यांनाच पॉवर दाखवणारी अंजली कृष्णा नेमक्या कोण?

Vanraj Andekar Case: तोच महिना अन् आंदेकर टोळीने नाना पेठेतच आयुषचा गेम केला, पुण्यात रक्तरंजित थरार

HIV: एचआयव्हीच्या रुग्णांनी कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत?

SCROLL FOR NEXT