Yoga in Mumbai Train: आज आंतरराष्ट्रीय योग दिन संपूर्ण जगभर साजरा करण्यात आला. योगा करणे प्रत्येकाच्या आयुष्यात किती महत्वाचे आहे हे आज ठिकठिकाणी कार्यक्रम घेत लोकांना सांगण्यात आले. सोसायटी, शाळा अशा अनेक ठिकाणी योग दिवस साजरा करण्यात आला आहे. अशात या योग दिनाचं महत्व सागंण्यासाठी काही मंडळी थेट लोकल ट्रेनमध्ये पोहचली आहेत. (Latest Marathi News)
घरी असलेल्या आणि फावला वेळ मिळत असलेल्या व्यक्तींना योगा करणे सहज शक्य आहे. मात्र रोजच्या धावपळीच्या आणि धकाधकीच्या जीवनात योगा करणे थोडं कठीण आहे. नोकरी, घर, ट्रेन प्रवास अशा सर्व ठिकाणी व्यक्ती व्यस्त असतात. त्यामुळे त्यांना इतर कुठेही जास्तीचा वेळ देता येत नाही. मुंबईच्या उपनगरांध्ये कर्जत, कसारा अशा ठिकाणी राहणाऱ्या व्यक्ती मुंबईत नोकरी करत असल्यास त्यांचे ६ ते ७ तास प्रवासातच जातात. त्यामुळे अशा प्रवाशांसाठी एका ग्रूपने थेट मुंबई लोकल गाठली आहे.
मुंबई लोकलमध्ये केला योगा
मुंबई लोकलमध्ये आल्यावर त्यांनी नागरिकांना योगा करण्याचे फायदे सांगितले असून प्रवाशांकडून योगा करुन घेतला आहे. प्रवाशांनी केलेल्या योगाचा काहींनी व्हिडिओ देखील शूट केलाय. हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर जोरदार व्हायरल (Viral) होताना दिसत आहे. व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी यावर कमेंट्सचा वर्षाव केलाय.
योग दिनाचा इतिहास
27 सप्टेंबर 2014 रोजी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्रांच्या बैठकीत आंतरराष्ट्रीय योग दिवस (International Yoga Day) साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला. ज्या अंतर्गत वर्षातील कोणताही एक दिवस योग दिन म्हणून साजरा करण्याची मागणी करण्यात आली होती.
संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेने हा प्रस्ताव मान्य केला. त्यानंतर दरवर्षी २१ जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस (International Yoga Day) म्हणून साजरा करण्याची घोषणा करण्यात आली. त्यानंतर २१ जून २०१५ रोजी पहिला आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला. तेव्हापासून दरवर्षी २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जातो.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.