Boy Hits Belt In Train Door Saam TV
व्हायरल न्यूज

Boy Hits Train Door Passenger: धावत्या ट्रेनच्या दरवाजातून प्रवाशांना बेल्टचे फटके; काळजात धडकी भरवणारा व्हिडिओ Viral

Boy Hits Belt In Train Door: या व्हिडिओमध्ये एका तरुणाने केलेलं कृत्य पाहून तुमच्याही तळपायाची आग मस्तकात जाईल.

Ruchika Jadhav

Indian Railway Viral Video: सोशल मीडियावर बऱ्याचदा अनेक विचित्र गोष्टी व्हायरल होतात. यातील काही दृश्य काळीज हेलावणारे असतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ जोरदार व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये एका तरुणाने केलेलं कृत्य पाहून तुमच्याही तळपायाची आग मस्तकात जाईल. (Latest Train Viral Video)

व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत आहे की, एक तरुण एक्सप्रेस ट्रेनच्या दरवाजात उभा आहे. दरवाजात थांबत त्याने आपल्या हातात एक पट्टा घेतलाय. तरुण उभा असलेल्या ट्रेनच्या समोरील रुळांवरुन दुसरी एक ट्रेन धावत आहे. या ट्रेनमध्ये देखील काही व्यक्ती दरवाजाजवळ उभे आहेत. अशात हा तरुण आपल्या पट्ट्याने दरवाजात असलेल्या प्रवाशांवर हल्ला करताना दिसतोय.

दरवाजात उभा असलेला तरुण पट्ट्याने समोरच्या ट्रेनमधील प्रवाशांवर जोरदार हल्ला करत आहे. पट्ट्याचा मार फार जोरात लागतो. असे केल्याने समोरील अनेक व्यक्तींना गंभीर दुखापत झाल्याची भीती आहे. पट्ट्याचा मार लागल्याने एखादी व्यक्ती धावत्या ट्रेनमधून खाली पडून मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता होती.

सोशल मीडियावर @I_DEV_1993 या ट्विटर अकाउंटवर हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. तरुणाने व्हिडिओ पोस्ट करत यावर संताप व्यक्त केलाय. सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी देखील या व्हिडिओवर अक्षेप घेत पट्ट्याने हल्ला करणाऱ्या तरुणाविषयी संताप व्यक्त केलाय.

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर भरतीय रेल्वेकडून तातडीने यावर अॅक्शन घेण्यास सुरुवात झाली आहे. या व्हिडिओवर रिप्लाय करत रेल्वेकडून म्हटलं आहे की, सदर घटना आमच्या निदर्शनास आणून दिल्याबद्दल धन्यवाद, आम्ही तातडीने या व्यक्तीचा शोध सुरू करत आहोत. लवकरच संबंधित व्यक्तीवर योग्य ती कारवाई केली जाईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Scenic Train Journey: भारताच्या या ८ रेल्वेतून प्रवास करा अन् स्वर्गसुखाचा आनंद लुटा

Pune Ganeshotsav: विसर्जन मिरवणुकीच्या दुसऱ्या दिवशी 'डीजे'ला परवानगीची गरज नाही, पोलिस आयुक्त काय म्हणाले?

Maharashtra Live News Update : केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक संपली

Cabinet Decisions : मंत्रिमंडळाच्या बैठकीत ८ मोठे निर्णय; १० जिल्ह्यात 'उमेद मॉल' अन् बरेच काही

Nashik : कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक; अधिकारी न भेटल्याने जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर कांदे फेकून आंदोलन

SCROLL FOR NEXT