व्हिएतनामध्ये एमबीबीएसचे शिक्षण घेणाऱ्या २१ वर्षीय भारतीय तरुणाचा एका विचित्र अपघातात मृत्यू झाला. हा तरुण दुचाकीवरुन वेगाने जात होते. दुचाकीवरचे त्याचे नियत्रंण सुटले आणि त्याची बाईक समोरच्या भिंतीवर जोरात आदळली. या अपघातात तरुणाचा मृत्यू झाला, तर त्याच्यामागे बसलेल्या मित्राला गंभीर दुखापत झाली.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत तरुणाचे नाव अर्शीद आश्रित असे आहे. तो एमबीबीएसच्या तिसऱ्या वर्षात शिकत होता. व्हिएतनामधील एका महाविद्यालयात अर्शीद शिकत होता. कॅन थो शहरात त्याच्या बाईकचा अपघात झाला. अपघाताची घटना आसपासच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये कैद झाली. दुर्घटनेचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फुटेजमध्ये सुरुवातीला काहीवेळ शांतता पाहायला मिळते. क्लिपमध्ये फारसं काही दिसत नाही. त्यानंतर एक वेगाने येणारा बाईक व्हिडीओत दिसते. बाईकस्वार उजवीकडे वळण्याचा प्रयत्न करतो, पण बाईक सरळ जाऊन समोरच्या भिंतीवर आदळते. आदळल्यानंतर बाईक उडून लांब पडते. बाईकवर बसलेले दोघेजण रस्त्यावर जखमी अवस्थेत पडलेले दिसतात.
व्हिएतनाममध्ये झालेल्या बाईक अपघातात मृत्यूमुखी पडलेला अर्शीद आश्रित हा मूळचा तेलंगणाच्या कुमुराम भीम आसिफाबाद जिल्ह्यातील रहिवासी आहे. त्याचे आईवडील कापड्यांचे व्यापारी आहेत. ही माहिती समोर आल्यानंतर आमदार डॉ. पी हरीश बाबू यांनी आश्रितच्या घरी भेट दिली. केंद्रीय मंत्र्यांशी चर्चा करुन आश्रितचा मृतदेह भारतात परत आणण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्याची विनंती आमदार हरीश बाबू यांनी केंद्रीय मंत्री जी किशन रेड्डी यांना केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.