Holi celebrations In Flight: होळीचा सण आला की, सर्वत्र रंगांची उधळण, गाणी शिवाय डान्सचा उत्साह आपल्याला दिसतो. सोशल मीडियावरही यंदाही अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत, त्यातील एक खास व्हिडिओ म्हणजे एका विमानात एअर होस्टेसचा धम्माकेदार डान्स. या व्हायरल व्हिडिओत एअर होस्टेस बलम पिचकारी या लोकप्रिय गाण्यावर थिरकताना दिसत आहेत. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान गाजत असून, नागरिक त्यावर मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया देत आहेत.
विमानात कॅबिन क्रूने प्रवाशांसाठी होळीचा(Holi) दिवस खास बनवण्यासाठी अनोखा परफॉर्मन्स दिला. त्यांनी बलम पिचकारी हे लोकप्रिय गाण वाजवल्यानंतर डान्स करण्यास सुरुवात केली. एअर होस्टेसच्या एनर्जेटिक परफॉर्मन्सने प्रवाशांना भुरळ घालती आणि प्रवाशांची या खास क्षणाचे व्हिडिओ शुटही केले आणि सोशल मीडियावरही शेअर केले.
काही मिनिटांतच हा व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्याला लाखो व्ह्यूज आणि लाईक्स मिळाले. मात्र तो व्हिडिओ इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील ''spicejetairlines''या अकाउंटवर शेअर करण्यात आलेला आहे. अशाप्रकारचे अनेक व्हिडिओ यापूर्वीही समोर आले आहेत. ज्यात अनेक एअरलाइन कंपन्या प्रवाशांसाठी काही खास सरप्रायजेस देतात, जेणेकरून त्यांचा प्रवास संस्मरणीय ठरावा.
विमानातील व्हिडिओ व्हायरल(Viral) झाल्यानंतर युजर्सनी त्यावर मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी या एअर होस्टेसच्या उत्साही अंदाजाचे कौतुक केले आहे, तर काही यूजर्संनी होळीचा हा अनोखा सेलिब्रेशन पाहून आनंद व्यक्त केला.
टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.