सध्याच्या काळात बदलत्या जीवनशैलीमुळे तरूणांपासून वयोवृद्धामध्ये हृदयविकाराच्या झटक्याचं प्रमाण वाढत आहे. मध्य प्रदेशमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. घटनेचा मन सुन्न करणारा व्हिडिओ देखील समोर आला आहे.
आपल्याला सोशल मीडियावर अनेक भंयकर असे व्हिडिओ पाहायला मिळतात. कधी थरारक अपघांताचे व्हिडिओ असतात तर कधी डान्स करताना हृदयविकाराचा झटक्यामुळे मृत्यूमुखी पडणाऱ्या व्यक्तीचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. अशातच सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे,ज्यात एक व्यक्ती त्याच्या कुटुंबियांसोबत हॉटेलमध्ये बसलेला असताना त्याला हृदयविकाराचा झटका येतो.('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत आपण पाहू शकतो की, हॉटलेमधील एका टेबलावर एक कुटुंब जेवणासाठी बसलेले आहे. हॉटेलमधील वेटर येऊन त्यांना जेवन वाढून निघून जातो. टेबलवर बसलेल्या वयस्कर व्यक्तीला त्रास होत असल्याचे जाणवत आहे.
काही वेळानंतर त्याच्या बाजूला पाढंऱ्या रंगाचा शर्ट घातलेला एक तरूण येतो. दरम्यान वयस्कर व्यक्ती टेबलवर पडतो. त्याच्यासोबत असलेले लोक त्याला बघून उठवायचा प्रयत्न करतात परंतू बसलेल्या खुर्चीवरूनही खाली पडतो.
सोशल मीडियावर हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडिओ @mukeshb22315350 या एक्स (ट्वीटर ) अकाउंटवर पोस्ट करण्यात आला आहे. व्हायरल व्हिडिओ मध्य प्रदेशमधील असल्याचे समजत आहे .तसेच सर्व घटना हॉटेलच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झालीये.
व्हिडिओ व्हायरल होताच नेटकऱ्यांच्या तूफान प्रतिक्रिया येत आहेत. व्हिडिओवर युजरने लिहिलं आहे की,'कोविडनंतर अशा प्रकरणांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे'. तर आणखी एका युजरने लिहिलंय की,'अतिशय दु: खत घटना'.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.