व्हायरल न्यूज

सीएम नितीश कुमार यांच्या तिरंदाजीचा व्हिडिओ पाहिला का? रावणाला बाण मारण्याऐवजी केलं भलतंच..; Video Viral

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा एक व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे. ज्यामध्ये त्याच्या हातातून धनुष्यबाण निघताना दिसत आहेत.

Bharat Jadhav

देशभरात दसरा साजरा केला गेला. असत्यावर सत्याच्या विजयाचा सण असलेल्या दसऱ्याच्या दिवशी लोकांनी रावणाचे दहन केले. यावेळी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार देखील धनुष्यबाण मारताना दिसले, पण याच दरम्यान त्यांच्यासोबत असे काही घडले, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

पाटणा येथील गांधी मैदानावर आयोजित दसरा सोहळ्यात मुख्यमंत्री नितीश कुमार आणि उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी सहभागी झाले होते. यावेळी सर्व पाहुण्यांच्या हातात धनुष्यबाण देण्यात आले. सीएम नितीशही धनुष्यबाण घेऊन उभे राहिले होते. मात्र शेजारी उभ्या असलेल्या मंत्र्यांकडून ते याबाबत विचारपूस करताना दिसले. त्यानंतर जेव्हा रावण दहनासाठी धनुष्यातून बाण सोडायचा होता तेव्हा सीएम नितीश यांनी धनुष्यबाणातून बाण सोडण्याऐवजी धनुष्यबाणच फेकला. तर बाकीच्या पाहुण्यांच्या हातात धनुष्यबाण होते.

हा प्रकार घडल्यानंतर नितीश कुमार काहीसे उदास दिसले. हाच व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. या कार्यक्रमात पारंपारिक नृत्य आणि संगीतासह अनेक कार्यक्रम सादर करण्यात आले आहे. या कार्यक्रमांनी प्रेक्षकांची मने जिंकली. यानंतर रात्र जसजशी जवळ येऊ लागली तसतशी आतषबाजीने आकाश उजळून निघाले.

पाटणा येथील गांधी मैदानावर आयोजित कार्यक्रमात रावणाला मैथिली रूप देण्यात आले. त्यामुळे मिथिलाच्या सांस्कृतिक परंपरेची झलक पाहायला मिळाली. हा ८० फुटांचा पुतळा होता.हा कार्यक्रम खूप खास होता. यावेळी क्रेनद्वारे हनुमानाची एंट्रीही दाखवण्यात आली होती. भगवान श्रीरामांनी रावणाचा वध करून विजय मिळवला होता. त्यामुळे या सणाला विजयादशमी असेही म्हणतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्यात नसरापूरमध्ये महिलेला हिप्नॉटाइज करत भरदिवसा सोन्याची लूट

Marathi Serial Update : तुमच्या आवडत्या मालिका नवीन वेळेत, आताच वेळापत्रक नोट करा

Weight Loss Facts: उपाशी राहिल्याने वजन कमी होतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारणं

Horoscope Saturday Update : शत्रु त्यांचे काम करतील, तुम्ही तुमचे काम करा; आजचे राशीभविष्य

Indian Railway: रिल्स बनवणाऱ्यांनो ऐकलं का? रेल्वे स्टेशनवर रील बनवाल तर याद राखा, नेमकी काय कारवाई होणार?

SCROLL FOR NEXT