Viral Video Saam Digital
व्हायरल न्यूज

Viral Video: नवरी बाईचा थाटच निराळा..डीजे वाल्याने गाणं बंद केल्याने चक्क ओला गाडीवर वाजवली गाणी; जुगाडू VIDEO पहाच

Desi Jugaad Viral Video: सोशल मिडियावर एका नवरीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे,ज्यात संगीतच्या क्रार्यमात नवरीच्या डान्सचे गाणे वाजवण्यासाठी ओला गाडीचा वापर करण्यात आला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Played Songs On Electric Scooters In Wedding

लग्न हा तरुण-तरुणींच्या आयुष्यातला खूप मोठा दिवस असतो.जर घरातल्या मुलीचे लग्न असेल तर घरातला प्रत्येक सदस्य मुलीच्या सगळ्या आवडी-निवडी जपत असतो.मोठ्यातला मोठा हट्ट ही मुलीचा पूर्ण केला जातो.मग गोष्ट जर तिच्याच लग्नातील असेल तर काही केल्या मुलीची इच्छा पूर्ण केली जाते. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

लग्न म्हटलं की,आदल्या दिवशीपासून सर्व कार्यक्रम सुरु होतात.काही ठिकाणी आता हळद आणि संगीतचा प्रोग्राम लग्नाच्या आदल्या दिवशी केला जातो. मग नवरा-नवरीपासून ते सर्व वऱ्हाडी मंडळीचा धमाक्केदार डान्स सादर होत असतो.अशातच सोशल मिडियावर एका नवरीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे,ज्यात संगीतच्या क्रार्यमात नवरीच्या डान्सचे गाणे वाजवण्यासाठी ओला गाडीचा वापर करण्यात आला आहे.सध्या या व्हिडिओने सर्वत्र धुमाकूळ घातला आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत दिसते की, लग्नाच्या हॉलमधील स्टेजवर नवरी नाचताना दिसते. नवरीने गुलाबी रंगाचा ड्रेस परिधान केलेला आहे. स्टेजच्या खाली एक कॅमेरामॅन तिच्या डान्सचे फोटो आणि व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद करतोय. तर त्याच्या बाजूला भगव्या रंगाची ओला स्कुटरही आहे. या स्कुटरमध्ये असलेल्या गाण्याच्या स्पीकरवर गाणी लावण्यात आली आहे. तर सर्व सदस्य खुर्चीवर बसलेले आहेत. मात्र स्पीकर असताना नेमकं असं का केल असेल असा प्रश्न तुम्हाला ही पडला असेल ना?

मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रावरील saurav_rokade_ssr_officialया अकाऊंटवर व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडिओच्या खाली कॅप्शनमध्ये लिहिले आहे की,हळद आणि संगीत एकाच दिवशी होत तर हळद लावण्यात आणि डीजे वर नाचण्यात टाइम निघून गेला रातरी ११ वाजता संगीतचा कार्यक्रम चालू झाला

आणि पार एकवाजे पर्यंत डीजे हळू आवाजात चालू होता पण नंतर पोलीस आल्या कारणाने डीजे बंद करावा लागला आणि सगळ्यात इनपोर्टेंट म्हणजे नवरीचा डान्स सगळ्यात शेवटी होता तर काय करायचं म्हणून माझ्या मित्राने olaघेऊन आला आणि त्यात गाणं लाऊन शेवटचा नवरीचा डान्स पूर्ण केला. आणि तिची इच्छा पुर्ण झाली स्वत:च्या लग्नात नाचायची.

सोशल मिडियावर व्हिडिओ नेटकऱ्यांच्या पसंतीस आला आहे. एका यूजरने लिहिले आहे की,' सगळ्यांना घरी जायच आहे असं दिसते त्यांच्या चेहऱ्यावरुन' तर आणखी एका यूजरने लिहिले आहे की,'संसार चांगला होईल यांचा'. व्हिडिओ पोस्ट होताच हजारोंच्या घरात व्ह्यूज मिळाले असून मोठ्या प्रमाणात लाईक्स मिळत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Police Death: पोलीस दलात आत्महत्येचं सत्र काही थांबेना! ४ दिवसात ३ आत्महत्या, काय आहे कारण?

Mahalaxmi Vrat 2025 : महालक्ष्मी व्रताची तारीख, पूजा विधी, महत्व घ्या जाणून

Maharashtra Live News Update: ते वक्तव्य करून अजित पवारांकडून मला टॉर्चर करण्याचा प्रयत्न; राम शिंदेंचा आरोप

Gunfire Shooting : क्लबमध्ये अंदाधुंद गोळीबार! तिघांचा जागीच मृत्यू, आठजण जखमी

Astro Tips: सकाळी उठल्यावर आरशात पाहणे शुभ असते की अशुभ?

SCROLL FOR NEXT