Tractor Accident Viral Video Saamtv
व्हायरल न्यूज

Tractor Accident Viral Video: भयंकर अन् विचित्र अपघात... ट्रॅक्टर चोरायला गेला अन् थेट चाकाखाली सापडला| थरकाप उडवणारा VIDEO

Gujrat Tractor Accident CCTV Footage: जो ट्रॅक्टर चोरायला गेला त्याच ट्रॅक्टरखाली सापडला; चक्रावून टाकणाऱ्या विचित्र अपघाताचा व्हिडिओ तुफान व्हायरल

Gangappa Pujari

Gujrat Accident Viral Video: सोशल मीडिया म्हणजे एकापेक्षा एक भन्नाट, धक्कादायक आणि चक्रावून टाकणाऱ्या व्हिडिओंचा खजिना. सोशल मीडियावर असंख्य व्हायरल व्हिडिओ पाहायला मिळतात. हे व्हिडिओ कधी कधी प्रचंड भयानक असतात. सध्या असाच एक व्हिडिओने नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे. ज्यामध्ये ट्रॅक्टर चोरी करायला गेलेल्या चोरासोबत भलताच प्रकार घडल्याचे दिसत आहे. काय आहे या व्हायरल व्हिडिओची स्टोरी, जाणून घ्या सविस्तर...

काय आहे व्हिडिओ?

सोशल मीडियावर (social media) एका चोरासोबत घडलेल्या भयंकर प्रकाराचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. हा तरुण ट्रॅक्टर चोरीसाठी गेला होता. मात्र सुरू केलेला ट्रॅक्टर त्याच्याच अंगावरुन गेला. हा व्हिडिओ समोरुन आल्यानंतर नेटकरीही चक्रावून गेले आहेत.

चोरी पडली महागात...

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक चोर मध्यरात्रीच्या सुमारास ट्रॅक्टर चोरी करण्यासाठी जातो. दुकानासमोर तीन- चार ट्रॅक्टरपैकी एक ट्रॅक्टर चोरी करण्याचे तो ठरवतो. त्यामधील एक ट्रॅक्टर तो चालू करतो. मात्र खाली उभा राहून इंजिन सुरू केल्याने ट्रक्टर थेट धावायला लागतो आणि चोर त्याच्या चाकाखाली येतो.

थेट चाकाखाली सापडला...

ही घटना इतकी भयंकर आहे की, चोराचा पाय चाकाखाली अडकल्याने त्याला बाहेर पडता येत नाही. ज्यामुळे तो खाली कोसळतो आणि संपूर्ण ट्रॅक्टरचे चाक त्यांच्या अंगावरुन जाते. ट्रॅक्टर निघून गेल्यानंतरही तो पळण्याचा प्रयत्न करतो, मात्र जखमी झाल्याने त्याला नीट चालता येत नसल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.

३१ ऑगस्टच्या मध्यरात्री गुजरातमध्ये (Gujrat) घडलेली ही संपूर्ण घटना सीसीटिव्ही (CCTV) कॅमेऱ्यात कैद झाली आहे. व्हिडिओ समोर आल्यानंतर थरकाप उडवणारी घटना पाहून नेटकऱ्यांनीही जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी चोरी करायला गेल्याने ही शिक्षा दिल्याचे म्हणले आहे, तर काही जणांनी पुन्हा असा प्रताप करु नको.. असा सल्लाही त्याला दिला आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Revdi Recipe: गूळ व तीळापासून तयार होणारी खमंग रेवडी एकदा घरी नक्की बनवा, नोट करा सिंपल रेसिपी

Pune : आषाढी एकादशीच्या दिवशी काळाचा घाला! पंढरपूरहून परतताना अपघात, टँकरची दुचाकीला धडक अन्...; हसताखेळता संसार उद्धवस्त

Food Digestion: खाल्लेले अन्न पचायला किती वेळ लागतो?

Farali Misal Recipe : झणझणीत फराळी मिसळ, उपवासाला एकदा करून तर बघा

Rain Alert : वाशिम जिल्ह्यात तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा; अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस

SCROLL FOR NEXT