Nashik Crime: सख्खा भाऊ पक्का वैरी... चाकून भोसकून लहान भावाची निर्घुण हत्या; मालेगावात खळबळ

Malegaon Crime News: मोठ्या भावाने लहान भावाची हत्या केल्याची घटना नाशिकमध्ये घडली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांवनी धाव घेत आरोपी भावाला अटक केली आहे.
Nashik Crime News
Nashik Crime NewsSaam Tv

अजय सोनावणे, प्रतिनिधी

Nashik Malegaon Crime News: सख्ख्या भावानेच लहान भावाला संपवल्याची धक्कादायक आणि तितकीच हादरवुन टाकणारी घटना मालेगावमधून (Malegaon) समोर आली आहे. वारंवार होणाऱ्या भांडणामुळे हे क्रूर कृत्य केल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. (Crime News In Marathi)

Nashik Crime News
Parbhani Crime News: परभणीत सरकारी अधिकाऱ्याची आत्महत्या; घटनेमागचं कारण काय?

याबाबत सविस्तर माहिती अशी की, सख्ख्या भावानेच चाकू भोकसून २३ वर्षीय तरुण भावाची हत्या केल्याची धक्कादायक घटना नाशिकच्या (Nashik) मालेगावातील नूरबागमध्ये समोर आली. जाविद अहमद मोहम्मद जमील असे मृत तरुणाचे नाव आहे. तर मुद्दसीर अहमद मोहम्मद जमील असे आरोपी भावाचे नाव आहे.

मृत जाविद व आरोपीमध्ये सतत भांडणे होत होती. या वादातूनच मुद्दसीरने जाविदचा खून केला. या धक्कादायक घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांवनी धाव घेत आरोपी भावाला अटक केली. त्याच्या विरोधात गुन्हाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत. (Crime Story)

Nashik Crime News
Uddhav Thackeray News: 'गद्दारांना त्यांच्याच खोक्यात गाडून टाकू...' जळगावच्या सभेतून उद्धव ठाकरे कडाडले; शिंदे- फडणवीसांवरही हल्लाबोल

अल्पवयीन मुलीची आत्महत्या...

कल्याणमध्ये (Kalyan) अल्पवयीन मुलीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अल्पवयीन मुलीची काही जण छेड काढत असल्याने ती मानसिक तणावात होती. यातूनच तिने जीवन संपल्याची माहिती समोर आली आहे. कल्याण पश्चिम परिसरातील ही घटना आहे. कल्याण बाजारपेठ पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com