Groom’s uncontrollable dance in wedding mandap stuns everyone; bride seen standing speechless Saam Tv
व्हायरल न्यूज

अगं बाई! भरमंडपातच नवरदेवाचा ऑफ कंट्रोल डान्स; 'ते' वागणं पाहून नवरीच झाली अवाक

Groom Dance Gone Viral: लग्नाच्या भरमंडपात नवरदेवाने केलेला हटके आणि धडाकेबाज डान्स पाहून नवरीही चकित झाली. पाहुणे, वऱ्हाड हसत होते, पण नवऱ्याचं वागणं पाहून नवरीच अवाक झाली. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

Tanvi Pol

Wedding Video: लग्न समारंभ म्हणजे आनंद, हास्य आणि आठवणींचा सुंदर मिश्रण.मात्र, कधी-कधी या आनंदाच्या क्षणात काही घटना अशा घडतात की त्या केवळ घरच्या मंडळींमध्येच नाही तर सोशल मीडियावरही धुमाकूळ घालतात. सध्या असंच काहीसं एका नवरदेवाने केलंय. त्याचा भर मंडपातला ऑफ कंट्रोल डान्स सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय आणि सर्वत्र याचीच चर्चा होत आहे.

लग्नाच्या(Wedding) दिवशी मंडपात सजावट, वाजंत्री, पाहुणे आणि दोघांच्या आयुष्यातील सगळ्यात खास क्षण असतो. या सगळ्यांच्या साक्षीने नवरदेवाची एन्ट्री झाली. पण पारंपरिक शिस्तीने नाचत येण्याऐवजी नवरदेवने असा काही हाय एनर्जीने डान्स केला की सगळे पाहुणे अवाक झाले. त्याने आधी मोकळ्या हाताने हातवारे करत मग थोड्याच वेळात जमिनीवर झोपून डान्स करत सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं

सुरुवातीला नवरी त्याचा डान्स पाहून हसत होती. पण जेव्हा तिच्या होणाऱ्या पतीने स्टेजवरच हातपाय फेकत, अंगभर घामाघूम होत नाचायला सुरुवात केली, तेव्हा ती ओशाळली. काही क्षण ती बघत राहिली आणि मग तिने मान खाली घातली. वऱ्हाडी मंडळी आणि घरच्यांचं हसू अनावर झालं. काही जण हसत होते, तर काही जण डोक्यावर हात ठेवून 'हे काय चाललंय' अशा भावनेत होते.

सध्या हा डान्स व्हिडिओ(Video) सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगाने व्हायरल होत असून तो सध्या इन्स्टाग्रामवरील devendrarajpoot46 या अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला आहे. ऐवढेच नाही तर अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत. एका यूजरने म्हटलं,''बिचारी नवरी कशात अडकली'' तर दुसऱ्या यूजरने म्हटलं,''घरी गेल्यानंतर भाऊ वहिनींचा जाम मार खाणार आहे'' अशा अनेक मजेशीर प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

टीप: हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

OBC/Maratha Reservation: हैदराबाद गॅझेट GR विरोधात ओबीसी कोर्टात; मराठा आरक्षणाला आव्हान

Bus Accident: भीषण अपघात! भरधाव बसची टँकरला धडक, ५० फूट खोल दरीत बस पलटली, अनेकजण वाहनाखाली दबले

Prime Minister Narendra Modi: पंतप्रधान मोदींकडून सरसंघचालकांचं कौतुक; ७५ व्या वाढदिवसामिनित्त दिल्या शुभेच्छा

Fact Check : महिलांसाठी स्वतंत्र दारू दुकान? सरकारकडून महिलांना पिण्याची स्पेशल सोय?

मराठा विद्यार्थ्यांना SEBC चा फटका? MPSC निकालात कट ऑफ वाढला

SCROLL FOR NEXT