हळदीत वहिनींचा डान्स पाहून सगळे घायाळ; ''चोली के पीछे'' गाण्यावर दिला जबरदस्त परफॉर्मन्स

Haldi Dance Video: हल्दी समारंभात वहिनीच्या जबरदस्त डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 'चोली के पीछे' या गाण्यावर तिचा परफॉर्मन्स पाहून सगळे पाहणारे थक्क झाले आहेत. तुम्हीही एकदा हा डान्स व्हिडिओ पाहा.
Bride’s sister-in-law stuns guests with her energetic dance to ‘Choli Ke Peeche’ at a Haldi celebration – viral moment captured on video
Bride’s sister-in-law stuns guests with her energetic dance to ‘Choli Ke Peeche’ at a Haldi celebration – viral moment captured on video
Published On

Dance Viral Video: सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. कोणताही सेलेब्रिटी नसून, एका विवाह सोहळा आणि त्यातही हळदी समारंभाचा एक खास क्षण आहे. पण यातील सगळ्यात लक्ष वेधणारा भाग म्हणजे त्या समारंभात झालेला डान्स! ''चोली के पीछे क्या है?'' या प्रसिद्ध बॉलिवूड गाण्यावर एका वहिनींनी दिलेला ठसकेबाज आणि आत्मविश्वासपूर्ण परफॉर्मन्स पाहून नेटकरी अक्षरशः घायाळ झाले आहेत.

विवाह समारंभातील हळदीचा कार्यक्रम म्हटलं की, घरातल्या मंडळींमध्ये हास्यविनोद, संगीत, नाचगाणी आणि मजामस्तीचा माहौल असतो. पण या हळदी समारंभातही नेमकं तेच घडलं. जसं गाणं सुरू झालं, तसं या तरुण वहिनींनी स्टेजवर एन्ट्री घेतली. ''चोली के पीछे'' हे गाणं सुरु होताच सगळ्यांचे लक्ष त्यांच्यावर खिळले. त्यांच्या अंगात आलेली ऊर्जा, चेहऱ्यावरील आत्मविश्वास, आणि डान्स(Dance)मधून दिसणारा उत्साह या सर्वांमुळे उपस्थितांनाच नव्हे, तर सोशल मीडियावरही लोक भारावून गेले आहेत.

या वहिनींनी साडी नेसूनही डान्स करताना ज्या सहजतेने स्टेप्स केल्या, त्यावरून त्यांचं डान्सिंगवर असलेलं प्रेम स्पष्ट दिसत होतं. त्यांच्या हावभावांतून, हातवाऱ्यांतून आणि लयबद्ध हालचालींमधून त्यांनी उपस्थितांच्या मनात जागा मिळवली. गाण्याचे बोल जरी जरा जणांना धक्कादायक वाटू शकतात, तरी त्यावर त्यांनी केलेला डान्स एकदम मर्यादेत आणि हसतमुख पद्धतीने सादर केला.

या डान्सचा व्हिडीओ(Video) पाहता क्षणीच लोकांनी तो सोशल मीडियावर शेअर करायला सुरुवात केली. फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअ‍ॅप आणि यूट्यूब अशा सर्वच प्रसिद्ध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हा व्हिडीओ प्रचंड गाजत आहे. एका यूजरने म्हटलं,''एक नंबर ताई'' तर अनेकांनी म्हटलं,''अशी मंडळी असली की हळदीमध्ये मज्जा येते''' तर अशा अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

टीप: हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

Bride’s sister-in-law stuns guests with her energetic dance to ‘Choli Ke Peeche’ at a Haldi celebration – viral moment captured on video
Grandmother Dance Video: नातीच्या लग्नात आजींचा जलवा; डान्स पाहुण नातेवाईक म्हणाले ''वा! क्या बात है!''

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com