Viral VIdeo Saam TV
व्हायरल न्यूज

Viral Video : दिल्ली मेट्रोत काहीही होऊ शकतं; नवीन व्हिडीओ पाहून तुम्हीही चकीत व्हाल!

Delhi Metro Viral Video : व्हायरल झालेल्या व्हिडीओ एक विद्यार्थिनी दिसत आहे. पण ही मुलगी एकटी नाहीतर तिने तिची सायकल देखील मेट्रोमध्ये आणली आहे.

प्रविण वाकचौरे

Viral Video :

दिल्ली मेट्रोमधील भांडण, मारामारी, गाणी आणि रोमान्सचे अनेक व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील. काही व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांचा संताप अनावर झाला तर काहींना हसू आवरेना. आता दिल्ली मेट्रोतील आणखी एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हीही म्हणाल दिल्ली मेट्रोमध्ये काहीही होऊ शकतं. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आता व्हायरल झालेल्या व्हिडीओ एक विद्यार्थिनी दिसत आहे. पण ही मुलगी एकटी नाहीतर तिने तिची सायकल देखील मेट्रोमध्ये आणली आहे. हा व्हिडिओ आता व्हायरल झाला आहे. लोकही या व्हिडीओवर अनेक कमेंट्स करत आहेत.

व्हिडिओमध्ये दिसत आहे की, एक मुलगी मेट्रोमध्ये सायकल घेऊन उभी असल्याचे दिसत आहे. मेट्रोमध्ये किवा सार्वजनिक वाहनातून सायकलने प्रवास असं सहसा पाहायला मिळत नाही. व्हिडिओ पाहून काही लोक आश्चर्य व्यक्त करत आहेत. तर काहींनी मजेशीर कमेंट्सही केल्या आहेत.   (Latest Marathi News)

व्हिडीओ दिल्ली मेट्रोचा की नागपूर मेट्रोतील?

सोशल मीडियावरील काही युजर्सने हा व्हिडिओ दिल्ली मेट्रोचा असल्याचे म्हटले आहे. तर काहींनी हा व्हिडिओ नागपूर मेट्रोचा असल्याचा दावा केला आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर एका सोशल मीडिया यूजरने कमेंट केली की, दीदी सायकल पार्क करत होती आणि मध्येच मेट्रो आली. एकाने विचारलं की, सायकलचं तिकीट काढलं का?

सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

मात्र हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मेट्रोच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. मेट्रोमध्ये सायकल घेऊन जायला परवानगी आहे का? जर परवानगी नसेल तर अशाप्रकारे सायकल घेऊन जाण्यापासून रोखण्यासाठी कुठलीही यंत्रणा स्टेशन परिसरात नाही का? असा प्रश्न देखील लोक उपस्थित करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: डोंबिवली रेल्वे स्टेशनवर एकादशी वारीचा पारंपरिक गजर

Prataprao Jadhav : मुंबई गुजरातची राजधानी होती, शिंदे सेनेच्या प्रतापराव जाधवांचे वक्तव्य

Politics: 'छत्रपती संभाजी राजेंनी १६ भाषा शिकल्या, ते काय मु**'; शिंदे गटातील आमदाराची जीभ घसरली

Ashadhi Ekadashi: आज आषाढी-देवशयनी एकादशीला करा हे सोपे उपाय; जीवनातील समस्या होतील पटकन दूर

Monsoon Alert : पुण्याला रेड अलर्ट, घाटमाथ्यावर धो धो कोसळणार, पुढील ५ दिवस आषाढधारा, वाचा हवामानाचा अंदाज

SCROLL FOR NEXT