Local Viral Video  
व्हायरल न्यूज

Local Train Viral Video : धावत्या रेल्वेत दुमदुमला सुर; तरुणीने मधुर आवाजात गायली गवळण, पाहा VIDEO

Girl Singing Gavlan Song in Local Train : ट्रेनमधील सिटसाठी भांडणे असोत, ट्रेनमध्ये बसून भाजी निवडने किंवा कोणी गाणं म्हणतानाचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. सध्या देखील असाच एक भन्नाट व्हिडिओ समोर आला आहे.

Ruchika Jadhav

Viral Video :

प्रवास लांबचा असेल तर लोकांना रेल्वेचा प्रवास सोपा वाटतो. तुम्ही लोकलमध्ये प्रवास केला असेल तर तुम्ही वेगवेगळ्या व्यक्तींना भेटता. लोकल ट्रेनचे आजवर अनेक व्हिडिओ व्हायरल झालेत. मग ते ट्रेनमधील सिटसाठी भांडणे असोत, ट्रेनमध्ये बसून भाजी निवडने किंवा कोणी गाणं म्हणतानाचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. सध्या देखील असाच एक भन्नाट व्हिडिओ समोर आला आहे.

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक मुलगी छान अशी गवळण गाताना दिसत आहे. तीला साथ देण्यासाठी तिथे उपस्थित प्रवासी देखील तीच्या सुराला सुर देत गाताना दिसत आहेत. या तरुणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्याप्रमाणात व्हायरल होत आहे. @'चला हवा येऊ द्या' या फेसबूक अकाउंटवर हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे.

या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, 'दही माझं लोण्याचं बिगर पाण्याचं ग बाई' या व्हायरल व्हिडियोमध्ये एक मुलगी 'दही माझं लोण्याचं बिगर पाण्याचं' ही सुप्रसिध्द गवळण गात आहे. प्रवाशांनी खचाखच भरलेल्या ट्रेनमध्ये या तरुणीने बिंधास्तपणे ही गवळण गायली आहे.

आजकाल सोशल मीडियावर फेमस होण्यासाठी तरुण मुलं-मुली डान्स आणि रील व्हिडीओ शूट करत असतात. त्यात आपली संस्कृती जपणारी फार कमी मुलं आहेत. त्यातीलच ही एक तरुणी. तरुणीने गावराण अंदाजात ठसकेदार गवळण गायल्याने सोशल मीडियामध्ये कमेंटमार्फत तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होताना दिसत आहे.

पोस्टवर कमेंट करताना एका यूजरने लिहिले की, 'खुप सुंदर गवळण ताई, आपण महाराष्ट्राच्या संस्कृतीचे आणि परंपरेचे जतन करता आपणास धन्यवाद. तर दुसऱ्या एका कमेंटमध्ये एका व्यक्तीने लिहिले आहे की, 'लोकल ट्रेनमधलं गाणी ऐकल्यावर असं वाटतं की मी पण ट्रेनने प्रवास करतोय, खूप छान सर्व टीम'.

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, व्हिडिओमध्ये दिसत असलेल्या मुलीचे नाव सानिका कणसे असे आहे. सानिका छान गवळण गाते आणि तिला साथ दोण्यासाठी दत्त प्रासादक भजन मंडळ तिच्या पाठोपाठ सुर लावताना दिसत आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे.

या व्हायरल व्हिडिओला आठ तासात 294 हजारांहून अधिक व्हुव्ज मिळालेत. सोबतच 19 हजारांहून जास्त लाईक्स आले आहेत. लोकलमध्ये प्रवास करताना बऱ्याचदा मुलामुलींचे ग्रुप्स अंताक्षरी खेळताना, गेम्स खेळताना दिसतात त्यांचा व्हिडिओ काडून सोशल मिडियावर टाकतात त्यातील काही व्हिडिओ युनिक असल्यामुळे व्हायरल होतात. आजकाल सोशल मिडियाच्या माध्यमातून बरेच लोकं फेमस होताना दिसतात. काही कंटेंट क्रिएटर म्हणून सुद्धा ओळखले जातात.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT