funny couple falling video viral on social media saam tv
व्हायरल न्यूज

Viral Video: रस्त्याच्या कडेला रोमान्स, Kiss करताना तोल गेला आणि...; पुढे जे घडलं ते पाहून हसू आवरणार नाही!

funny couple falling video viral on social media: सोशल मीडियावर एक मजेशीर व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये एक कपल रोमँटिक क्षणांमध्ये इतकं गुंततं की अचानक तोल जाऊन दोघंही खाली पडतात.

Surabhi Jayashree Jagdish

सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. यांतील काही व्हिडीओ गमतीशीर असतात, तर काही गंभीर. सध्या असाच एक मजेदार व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक जोडपे रस्त्याच्या कडेला त्यांच्या रोमँटिक क्षणांमध्ये इतके रमून जाते, की अचानक त्यांचा तोल जातो आणि ते दुसऱ्या बाजूला धाडकन पडतात.

हा प्रकार काहीसा गंभीर असतो, मात्र हा प्रसंग पाहिल्यानंतर तुम्हालाही हसू आवरणार नाही. सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी त्यावर विविध प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

सोशल मीडियावर कपलचा व्हिडीओ व्हायरल

हा व्हिडिओ इंस्टाग्रामच्या एका अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. त्यानंतर तो विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात शेअर होताना दिसतो आहे. काही सेकंदांचा हा व्हिडीओ असला, तरी त्यात कपलची झालेली फजिती लोकांना फार आवडली आहे.

काय घडले आहे नेमके व्हिडीओमध्ये?

व्हिडिओमध्ये दिसणारे जोडपे रस्त्याच्या कडेला उभे राहून रोमान्स करताना दिसत आहेत. या वेळी ते एकमेकांना 'किस' करताना इतके गुंतलेले असतात, की त्यांचा मागच्या बाजूला तोल जातो. तोल जाऊन ते दोघेही खाली पडतात. ते दोघेही पडल्यानंतर हा व्हिडीओ संपतो.

लोकांच्या विविध प्रतिक्रिया

या व्हिडिओवर लोकांनी अनेक प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. यावर एका व्यक्तीने म्हटले आहे की, 'खरंच, प्रेमात असे क्षण येतातच'. तर दुसऱ्याने लिहिले आहे की, 'हा व्हिडिओ पाहून हसू आवरत नाही, इतका मजेदार आहे'. काहींनी या जोडप्याच्या केअरफ्री अॅटिट्यूडचं कौतुक केलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोबाईल रिचार्ज महागणार! दर १५ टक्क्यांनी वाढण्याची शक्यता; पाहा तुमच्या खिशावर किती भार पडणार?

मायक्रोसॉफ्टनं 4800 कर्मचाऱ्यांना काढलं; AI वरील खर्चाच्या नावाखाली नोकरकपात

8th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांची बेसिक सॅलरी कशी ठरणार? 8व्या वेतन आयोगात कमाल पगाराबाबत 2 मोठे प्रस्ताव

Famous Actress : "पीरियड्स आले पण वॉशरूमला जायचीही सोय नाही..."; प्रसिद्ध अभिनेत्री मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर तब्बल ९ तास अडकली | VIDEO

NPS update : मोदी सरकारचा मोठा निर्णय; NPS मध्ये गुंतवणुकीचे २ नवे पर्याय, नेमका काय होणार फायदा?

SCROLL FOR NEXT