Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: नवरी जोमात नवरदेव कोमात! नेल पॉलिशमुळे सप्तपदीच थांबली; व्हायरल VIDEO पाहिला का?

Funny Viral Video: लग्नात नवरा-नवरी त्यांच्या आवडते फोटो येण्यासाठी खूप काळजी घेत असतात. मात्र अनेकदा असे काही जे पाहून प्रत्येकजण हसत असतो. असाच काही या व्हायरल व्हिडिओत झालेले आहे.

Tanvi Pol

New Bride Video: सध्या सर्वत्र लग्नकार्याची धामधुम सुरु आहे. नवरा-नवरीपासून ते लग्नकार्यात सहभागी होणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची लगबग सुरु असते. मात्र यातील फोटोशुट हा नवरा-नवरीसाठी महत्त्वाचा विषय. फोटोच चांगले येण्यासाठी नवरा-नवरीची तारेवरची कसरत करत असतात. मग त्यातून अनेकदा गमतीदार गोष्टी घडतात. सध्या असात एक गमतीदार गोष्टीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय, ज्यात नवरीने एका फोटोसाठी भरलग्नात असे काही केले ते पाहून प्रत्येकजण हसत आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ तुम्ही पाहू शकता की, व्हिडिओत एका स्टेजवर नवीन नवरी आणि नवरा बसलेला आहे. व्हिडिओत पाहिले तर स्टेजवर लग्नाच्या कार्यक्रमानिमित्ताने केलेली सजावटही दिसत आहे. मात्र लग्नकार्य (Wedding ceremony) सुरु असताना नवरीला एक तरुणी नेल पॉलिश लावत असते, जर व्हिडिओच्या वरील लिहिले वाक्य पाहिले तर त्यात लिहिले आहे की,''सप्तपदी घ्यायची अरे नेल पॉलिश तर राहिली,tag करा तुमच्या मैत्रिणीला जी लग्नात असं करेल'' असे लिहिले आहे. यावरुन फोटोत आणि व्हिडिओत पाय चांगले दिसावे म्हणून नवरीने चक्क काही वेळ काढून नेल पॉलिश लावत आहे. व्हिडिओ व्हायरल(Viral) होताच नेटकऱ्यांच्या पसंतीस आलेला आहे.

व्हिडिओ कोणत्या प्लॅटफॉर्मवर व्हायरल होतोय?

नवरीबाईचा व्हिडिओ सध्या ''इन्स्टाग्राम'' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत असून तो ''makeup_artist_durgesha'' या अकाउंटवर पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडिओ पोस्ट करुन कॅप्शनमध्ये,''Tag करा तुमच्या मैत्रिणीला लवकर''असे लिहिलेय. व्हिडिओ कधीचा आहे हे समजू शकलेले नाही मात्र सोशल मीडियावर नेटकऱ्यांच्या पसंतीस आलेला असून लाखोंच्या संख्येने व्ह्यूज व्हिडिओला मिळत आहेत.

नेटकऱ्यांच्या अनेक प्रतिक्रिया

इन्स्टाग्रामवर व्हिडिओ व्हायरल होताच अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत. त्यातील एक युजर्संनी बऱ्याच प्रतिक्रिया आलेल्या आहेत. त्यातील पहिल्या युजरने लिहिले आहे की,'' काय राव नवरीबाई'' तर अजून एका युजरने लिहिले'' पोरी काय करतील सांगता येत नाही'', अशा अनेक गमतीदार प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maval : मैत्रिणींसोबत खेळत असताना अनर्थ घडला; आद्रा धरणाच्या पाण्यात बुडून युवतीचा मृत्यू

Face Serum Tips: फेस सीरम लावण्याची योग्य पद्धत कोणती?

Mysterious stories from Mahabharata: शत्रू असूनही दुर्योधनाने अर्जुनाला का दिले होते ३ पराक्रमी बाण?

Nag panchami 2025: यंदा नाग पंचमी कधी आहे? जाणून घ्या

Milk And Curd: दूध आणि दही एकत्र खाल्ले तर काय होते?

SCROLL FOR NEXT