पंढरपुरातून एक संतापजनक घटना समोर आली आहे. येथील एका शाळेतील पोषण आहारामध्ये मेलेला बेडूक सापडला आहे. या धक्कादायक घटनेमुळे शाळेतील विद्यार्थ्यांच्या जीवाशी शासनाचा खेळ सुरू असल्याचं पालकांचं म्हणणं आहे. सदर घटनेचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
मिळालेल्या अधिक माहितीनुसार, शासनाकडून शालेय विद्यार्थ्यांना शाळेकडे आकर्षित करण्यासाठी, तसेच शाळेची गोडी लागण्यासाठी अनेक योजना राबवल्या आहेत. त्यातील एक योजना म्हणजे शालेय पोषण आहार. ही योजना आता चांगलीच वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. अनेक गरजू आणि गरिब घरातील विद्यार्थी शासकीय शाळांमध्ये शिक्षण घेतात अशी सध्याच्या शाळांची परिस्थिती आहे. त्यामुळे या लहान मुलांच्या जीवाशी उघपणे खेळ केला जात आहे.
आज कासेगाव येथील भुसे नगर येथील अंगणवाडीमधील पोषण आहार वाटप करताना एका बेटकाचं मेलेलं पिल्लू सापडलं. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या पालकांनी यावर संताप व्यक्त केला आहे. पोटभर जेवण केल्याने अभ्यासात मन लागतं. मुलं शांततेत शाळेत बसतात, तसेच त्यांचे पालन पोषण देखील व्यवस्थित होते. मात्र असं अन्न खाल्ल्यानंतर येथील मुलांना विषबाधा किंवा अन्य आजार होण्याची शक्यता आहे.
विद्यार्थ्यांच्या जेवणात जिवंत उंदीर
काही दिवसांपूर्वीच असाच आणखी एक किळसवाणा प्रकार समोर आला होता. हैदराबादच्या सुलतानपूर येथील जवाहरलाल नेहरु टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीच्या मेसमध्ये जेवणात जिवंत उंदीर फिरत होता. विद्यार्थ्यांनी ही घटना पाहताच त्यांना धक्का बसला. त्यानंतर युनिव्हर्सिटीमधील विद्यार्थ्यांनी मोबाईलमध्ये हा व्हिडिओ कैद केला. तसेच गोंधळ सुरू केला होता.
सदर व्हिडिओ एक्सवरील @IndianTechGuide अकाउंटवर शेअर करण्यात आला होता. त्या आधी देखील आयस्क्रिममध्ये मानवी बोट सापलं होतं. त्या घटनेमुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती. सोशल मीडियावर खाद्य पदार्थांचे आजवर अनेक विचित्र व्हिडिओ व्हायरल झालेत. त्यामुळे सध्या पावसाळ्यात बाहेरचं खाणं सुद्धा बंद करणे फायदेशीर आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.