Lonavala News SaamTv
व्हायरल न्यूज

Viral Video : दे दणादण! बस स्टॅन्डवर कॉलेजच्या पोरांची कुटाकुटी; व्हिडिओ तुफान व्हायरल

Free Style In Lonavla : लोणावळ्याच्या बस स्टॅन्डमध्ये दोन गटात फ्री स्टाईल हाणामारी झाली. बस स्टँड मधील काही कर्मचाऱ्यांनी मध्यस्थी केल्यानंतर हे वाद मिटले. या हाणामारीचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

Saam Tv

पुणे : पुणे जिल्ह्यातील लोणावळ्यात शाळकरी मुलांनी तूफान राडा घातला आहे. दोन गटात अगदी कपडे फाटेपर्यंत फ्री स्टाईल हाणामारी झाली आहे. या फ्री स्टाईल हाणामारीचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

लोणावळ्यात बस स्टॅन्ड परिसरतला हा व्हिडिओ असल्याचं सांगण्यात येत आहे. या ठिकाणी शाळकरी मुलांमधले वाद हा नेहेमीचा विषय झाला आहे. या ठिकाणी असलेल्या शाळा महाविद्यालयातील वादाचे पडसाद हे लोणावळ्याच्या बस स्टॅन्डवर उमटत असतात. अशाच एका शनिवारी झालेल्या राड्याचा जाब विचारण्यासाठी युवकाचा भाऊ गेला असता या ठिकाणी पुन्हा एकदा राडा होऊन तूफान फ्री स्टाईल हाणामारी झाली आहे.

एकमेकांचे कपडे फाडत डोक्यात हेल्मेटने प्रहार करण्यापर्यंत हा राडा झाला आहे. हाणामारी करणारे हे सर्व तरुण इयत्ता अकरावी आणि बारावीचे विद्यार्थी असल्याचं सांगण्यात येत आहे. क्षुल्लक कारणावरून सुरू झालेला शाब्दिक वाद हा हाणामारीपर्यंत जाऊन पोहोचला. याप्रकरणी पोलीस प्रशासनाने अद्याप कोणतीही कारवाई केलेली नसली तरी या राड्याचा व्हिडिओ सोशल मिडियावर तूफान व्हायरल होत आहे.

दरम्यान, हा सर्व राडा शाळेच्या परिसरापासून दूर झाला आहे, असं म्हणत याबद्दल कारवाई करण्यासाठी शाळा प्रशासनाने हात वर केले आहेत. केवळ आधीच्या भांडणाचा जाब विचारायला गेल्यावरून हा नवा राडा झाला असल्याने या सर्व राड्यावर बघ्यांकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. हे प्रकरण लोणावळा पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचले असून पोलिसांनी या महाविद्यालयीन तरुणांना योग्य ती समज दिली आहे.

हा सर्व प्रकार सुरू असताना लोणावळा बस स्थानकावर बघ्यांची गर्दी झाली होती. या गर्दीतीलच कोणीतरी हा व्हिडिओ काढून व्हायरल केला असल्याचं बोललं जात आहे. तर लोणावळ्याच्या बस स्थानकावर अशा प्रकारचा वाद काही नवीन नसून असा राडा अनेक वेळा याठिकाणी बघायला मिळतो. त्यामुळे यावर लोणावळा पोलीसांनी वेळीच कारवाई करून हे सतत होणारे वाद थांबवले पाहिजेत अशी मागणी होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime: तरुणाकडून वयोवृद्ध आईवर दोनदा बलात्कार, आधी बेदम मारहाण नंतर...; म्हणाला - 'ही तुझ्या कर्माची शिक्षा'

Tejashree Pradhan: तेजश्री प्रधान मुंबईत कुठे राहते? माहितीये का?

'युतीचं डोक्यातून काढून टाका'; महायुतीत अलबेल नाही? अजित पवार गटाचे खासदार असं का म्हणाले?

Maharashtra Live News Update: यवतमाळ जिल्ह्यातील तीनशे घरात शिरलं पाणी

Ravivar Upay: रविवारच्या दिवशी सूर्यदेवाची पुजा केल्यानंतर करा 'हे' उपाय; अडकलेली सर्व कामं होणार पूर्ण

SCROLL FOR NEXT