Metro Train Viral Video Saam TV
व्हायरल न्यूज

Metro Train Viral Video : बुक्कीत टेंगूळ! मेट्रोत दोन तरुणांमध्ये फ्री स्टाइल हाणामारी,VIDEO व्हायरल

Fighting in Bengaluru Metro Train Video Viral : या मेट्रोमध्ये देखील दोन तरुणांचा एकमेकांना धक्का लागला. धक्का का लगला यावरून त्यांच्यात आधी वाद झाला. नंतर हा वाद भांडणात बदलला आणि त्यांच्यात थेट हाणामारी सुरू झाली.

Ruchika Jadhav

मेट्रो आणि व्हायरल व्हिडिओ असं एक वेगळंच समिकरण झालं आहे. मेट्रोमध्ये आजवर अनेकांनी अतरंगी डान्स आणि स्टंट केलेत. तसेच महिलांच्या हाणामारीच्या व्हिडिओनेही नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. अशात आता देखील सोशल मीडियावर मेट्रोतील हाणामारीचा एक व्हिडिओ समोर आला आहे.

व्हिडिओमध्ये दिसत आहे की, मेट्रो ट्रेन प्रवाशांनी भरली आहे. बसण्यासाठी अजिबात जागा नाही. सर्व सिट्स फूल झाल्यात आणि अनेक प्रवासी मेट्रोमध्येच गर्दी करून उभे राहिलेत. गर्दी असल्यावर आणि मेट्रो ट्रेन आहे म्हटल्यावर एकमेकांना एकमेकांचा धक्का लागणे स्वाभाविक आहे. येथील दोन तरुणांमध्ये देखील त्यांना एकमेकांचा धक्का लागला आणि वादाला निमित्त झालं.

सहसा भांडणं महिलांच्या कोचमध्येच जास्त होतात असं म्हटलं जातं. मात्र जनरल कोचमध्ये माणसांची सुद्धा भांडणं आणि अगदी हाणामाऱ्या होत असतात. या मेट्रोमध्ये देखील दोन तरुणांचा एकमेकांना धक्का लागला. धक्का का लगला यावरून त्यांच्यात आधी वाद झाला. नंतर हा वाद भांडणात बदलला आणि त्यांच्यात थेट हाणामारी सुरू झाली. हाणामारीचा हा व्हिडिओ आता तुफान व्हायरल होत आहे.

सदर व्हिडिओ एका एक्स अकाउंटवर पोस्ट करण्यात आलाय. तसेच कॅप्शनमध्ये ही बंगळूरुमधील मेट्रो ट्रेन असल्याचं सांगितलं आहे. या दोन तरुणांची बेदम हाणामारी सुरू असताना अन्य व्यक्ती त्यांची भांडणे सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र दोघंही कुणाचंच ऐकण्यास तयार नाहीत. दोघांचा वाद आगदी टोकाला पोहचला आहे.

दोघांनी एकमेकांना जोरदार बुक्क्या मारल्यात. त्यांची ही फायटींग पाहून मेट्रोमधील अन्य प्रवाशांना सुद्धा याचा त्रास होत असल्याचं स्पष्टपणे समजत आहे. कशीबशी मेट्रोतील सर्वांनी दोघांची समजूत काढत त्यांना बाजूला केलंय. मेट्रो ट्रेनमध्ये भांडणं होण्याची ही काही पिहिलीच वेळ नाही. आजकाल अगदी दर महिन्यात एकदा किंवा दोनदा तरी असे व्हिडिओ पाहायला मिळतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: ठाकरे बंधूंवरून मविआत बिघाडी; मुंबईत कॉग्रेसचा स्वबळाचा नारा?

Mahayuti: महायुतीचं ठरलं! मुंबईत एकत्र,राज्यात स्वतंत्र, विजयाची रणनिती काय?

Cough Syrup: कफ सिरपनं घेतला आणखी एकाचा जीव; दोन चमचे औषध प्यायल्यानंतर महिलेनं सोडला जीव, रुग्णालयातच घडला धक्कादायक प्रकार

Microwave: मायक्रोवेव्हमध्ये अन्न गरम केल्याने होतात 'हे' परिणाम

Shocking : धक्कादायक! दारुच्या नशेत ५ जणांचा घरात घुसून महिलेवर सामूहिक अत्याचार

SCROLL FOR NEXT