Local Train Fighting Video Saam Tv
व्हायरल न्यूज

विरार-डहाणू लोकलमध्ये तुफान राडा! पुरुष प्रवाशांनी एकमेकांना अक्षरशः तुडवलं; व्हिडिओ झाला व्हायरल

Local Train Fighting Video: विरार-डहाणू लोकलमध्ये दोन पुरुष प्रवाशांमध्ये हाणामारी झाली. ट्रेनमध्ये चढताना एकमेकांना धडक दिल्यामुळे वाद निर्माण झाला आणि त्याचे रूपांतर भांडणात झाले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Tanvi Pol

Viral Train Video: मुंबई लोकल रेल्वे ही देशातील सर्वाधिक गर्दीची आणि व्यस्त रेल्वे व्यवस्था म्हणून ओळखली जाते. दर दिवशी लाखो प्रवासी या लोकल ट्रेनने प्रवास करतात. गर्दीच्या वेळेत स्टेशनांवर आणि ट्रेनमध्ये चढताना अनेकदा धक्काबुक्की, किरकोळ वाद, कधी कधी मोठ्या भांडणांमध्येही रुपांतर होते. अशाच प्रकारची एक घटना विरार-डहाणू लोकलमध्ये घडली आहे.

काय घडलं नेमकं?

सकाळच्या गर्दीच्या वेळेत विरारहून डहाणूकडे जाणाऱ्या लोकल(Local Train) ट्रेनमध्ये दोन पुरुष प्रवाशांमध्ये जोरदार वाद झाला. सुरुवातीला हा वाद चढताना दिलेल्या धक्क्यावरुन सुरू झाला. ट्रेनमध्ये चढताना दोघे प्रवासी एकमेकांना धडकले आणि त्या किरकोळ गोष्टीवरून एकमेकांमध्ये वाद उफाळला. काही क्षणातच हा वाद शाब्दिक भांडणात बदलला आणि नंतर त्याचे रूप शारीरिक हाणामारीत झाले.

ट्रेनमध्ये उपस्थित असलेल्या इतर प्रवाशांनी भांडण शांत करण्याचा प्रयत्न केला, मात्र काही काळासाठी वातावरण अतिशय तणावपूर्ण बनले होते. .या घटनेनंतर ट्रेनमधील काही प्रवाशांनी संबंधित स्टेशन मास्टर आणि रेल्वे पोलीस यांना माहिती दिली.

या घटनेचा व्हिडीओ (Video) काही प्रवाशांनी त्यांच्या मोबाईलमध्ये शूट केला असून तो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. काही यूजर्संनी म्हटलं,''हे कायमच आहे ट्रेनमधलं'' तर दुसऱ्या यूजरने म्हटलं,''हे नाही सुधारणार'' अशा अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

टीप: हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Farmer Loan Waiver: शेतकऱ्यांना कधी मिळणार कर्जमाफी? मुख्यमंत्र्यांनी सांगितली तारीख

Ind vs Aus Semifinal: शाब्बास पोरींनो! भारताच्या लेकींनी मैदान गाजवलं, ऑस्ट्रेलियाला नमवत फायनलमध्ये दणक्यात एन्ट्री

WC Semifinal: मानधनाच्या विकेटवर भरमैदानात राडा; थर्ड अंपायरच्या निर्णयानं फलंदाजासह ग्राउंड रेफरीही बुचकळ्यात

Maharashtra Opposition Unity : मतदारयाद्यांचा घोळ, निवडणुकीला विरोध? 'सत्याचा मोर्चा'साठी विरोधक एकवटले, VIDEO

रुपाली चाकणकराचं अध्यक्षपद धोक्यात?डॉक्टरचा सीडीआर जाहीर करणं भोवणार?

SCROLL FOR NEXT