बदलापुरात आज सकाळी वालिवली भागात भीषण अपघात.
मालवाहू ट्रकने तीन ते चार वाहनांना दिली जोरदार धडक.
अपघातात एका महिलेसह दोन जणांचा मृत्यू, काही जखमी.
सीसीटीव्ही फुटेज व्हायरल; चालक फरार, पोलीस तपासात व्यस्त.
Badlapur Walivali witnessed a horrific truck accident : बदलापूमध्ये आज सकाळी भीषण अपघात झाला आहे. वालीवलीजवळ मालवाहू आयशर ट्रकने चार चाकी वाहनाला जोरदार धडक दिली. यामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला आहे. अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला तर एकाचे उपचारावेळी निधन झाले. अपघातग्रस्त कारमध्ये तीन ते चार जण अडकले होते, तात्काळ स्थानिकांनी मदत करत रूग्णालयात दाखल केले. या भयंकर अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. (badlapur walivali truck accident cctv video)
बदलापुरातल्या वालिवलीत भीषण अपघात झाला आहे. एका मालवाहू आयशर ट्रकने चार चाकी गाडीला धडक दिली. यात एका महिलेचा जागीच मृत्य झालाय. अपघात एतका भयंकर होता की कारचा चेदामिंदा झाला . बदलापुरातल्या वालीवली कडून लादीने भरलेला हा ट्रक एरंजाडळच्या दिशेने निघाला होता. तीव्र उतारामुळे ट्रकचालकाचं नियंत्रण सुटलं आणि त्यामुळे अपघात घडला असावा, अशी प्रत्यक्षदर्शची माहिती आहे. या वाहनाने इतर दोन-तीन वाहना नाही धडक दिली असून त्यातही काही जण जखमी झाल्याच समजतंय.
बदलापुरातल्या भीषण अपघाताचं सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. आज सकाळच्या सुमारास एका आयशर ट्रकने वाली नाक्यावर तीन ते चार वाहनांना धडक दिली. या अपघातात दोन जणांचा मृत्यू झालाय. त्यात एका महिलेसह रिक्षा चालकाचा समावेश आहे. तीन ते चार जण गंभीरित्या जखमी झाले आहेत. सीसीटीव्ही फुटेजमधील वाहनाचा वेग पाहिल्यानंतर अपघाताची तीव्रता लक्षात येते. सुदैवाने कारमध्ये अडकलेल्या एका तरुणाला सुखरूप बाहेर काढण्यात आले. हा तरुण जिमला जाण्यासाठी निघाला होता. त्याचवेळी वालीवली ऐरंझाडच्या भरधाव वेगात निघालेल्या ट्रकने तीन ते चार वाहनांना धडक दिली. त्यानंतर हा ट्रक चार चाकीवर धडकला. अपघातानंतर ट्रक चालकांना घटनास्थळावरून पळ काढलाय. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.