Girls Fight In Delhi Metro: Saamtv
व्हायरल न्यूज

Delhi Metro Viral Video: बॉयफ्रेंडसोबत फिरतेस... सीटवरुन वाद, मेट्रोत रंगला तुफान राडा; व्हिडिओ व्हायरल

Girls Fight In Delhi Metro: दिल्ली मेट्रोमधील आणखी एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. ज्यामध्ये दोन तरुणींमध्ये चांगलीच जुंपल्याचे पाहायला मिळत आहे.

Gangappa Pujari

Viral Video News: कधी मुलांच्या स्कर्ट घालून एन्ट्रीने तर कधी कपलच्या रोमान्सने दिल्ली मेट्रो वादात सापडली होती. वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनीही त्यावर चांगलाच संताप व्यक्त केला होता. मेट्रोमधील आणखी एक व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होत असून यामध्ये महिलांमध्ये तुफान हाणामारी झाल्याचे पाहायला मिळत आहे. (Viral Video News In Marathi)

दिल्ली मेट्रो (Delhi Metro) आणि वाद हे प्रकरण काही नवीन नाही. दिल्ली मेट्रोमधील व्हायरल व्हिडिओ प्रकरण नेहमीच चर्चेचा विषय ठरत असतात. कधी महिलांची भांडणे तर कधी तरुण- तरुणींच्या अश्लिल चाळ्याने मेट्रो चांगलीच चर्चेत आली होती. सध्या मेट्रोमधील आणखी एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे.

ज्यामध्ये दोन मुलींमध्ये सीटवर बसण्यावरुन चांगलीच जुंपल्याचे (Girls Fight) दिसत आहे. या भांडणात एका तरुणाचीही एन्ट्री होते, ज्यानंतर वाद आणखीनच वाढतो. दोन्ही तरुणींमधील शाब्दिक चकमक ऐकून इतर प्रवाशांनाही हसू आवरत नाही.

व्हिडिओमध्ये (Viral Video) पाहू शकता की, तरुण आणि तरुणी सीटवर बसले आहेत. उभी असलेली महिला मुलीला थोडं सरकण्यास सांगते यावरुनच दोघींमध्ये बाचाबाची सुरू होते. तु मला पागल कसा म्हणालास? यावरुनच ती महिला मुलासोबत वाद घालायला सुरूवात करते. मुलासोबत असलेली तरुणी मुलाला शांत राहायला सांगते.

वाद इतका वाढत जातो की महिला मुलीच्या चारित्र्याबद्दलही अपशब्द वापरताना दिसत आहे. आई वडिलांना फसवून तु बॉयफ्रेंडसोबत फिरतेस, असेही ती म्हणते. यावरुन दोघींमध्ये वाद आणखी वाढतो. ट्रेनमधीलच व्यक्तीने हा संपूर्ण प्रकार मोबाईलमध्ये कैद केला आहे.

व्हिडिओ समोर आल्यानंतर तो हजारो लोकांनी पाहिला असून नेटकऱ्यांनी त्यावर जोरदार प्रतिक्रियाही दिल्या आहेत. काही जणांनी दिल्ली मेट्रोत हे रोजचचं आहे.. अशी कमेंट केली आहे. तर एका मुलाने मोठ्यांचे आदर करायला हवा असा सल्लाही तरुणीला दिला आहे. थोडक्यात आणखी एका राड्यामुळे दिल्ली मेट्रो पुन्हा चर्चेत आली आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sachin Sawant : मोठे साम्राज्य वाचविण्यासाठी सत्ताधाऱ्यांसोबत जातात; काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांचा कुणाल पाटील यांच्यावर निशाणा

Pune Fire : सिगारेट पेटवताच आगीचा भडका उडाला, चोराने सहा मोटारसायकल जाळल्या; पुण्यात भयंकर घडलं

Parenting Tips: मुलांना टिव्ही मोबाईलपासून दूर ठेवायचंय? मग करा 'या' गोष्टी

Maharashtra Live News Update : नाशिक महापालिकेच्या अग्निशमन दलाचे पथक रामकुंड परिसरात दाखल

Anushka Sen : अनुष्का सेनचा बॅकलेस गाउन लुक पाहिलात का?

SCROLL FOR NEXT