Pankaja Munde On CM Shinde: कोणीतरी घोषणा करून आरक्षण मिळणार नाही; पंकजा मुंडेंचा CM शिंदेना टोला

Maratha Aarakshan Andolan: मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे यासाठी अभ्यास गट स्थापन करून योग्य तो आकडा ठरवला पाहिजे,असे मत देखील पंकजा मुंडे यांनी व्यक्त केले आहे.
Pankaja Munde Latest Marathi News
Pankaja Munde Latest Marathi NewsSaam TV
Published On

Maratha Aarakshan:

मराठा आरक्षणाचा मुद्दा अजही चर्चेत आहे. मनोज जरांगे यांनी उपोषण मागे घ्यावे यासाठी सरकारमार्फत मोठे प्रयत्न सुरू आहेत. अशात निजामकालीन नोंदी असलेल्या मराठ्यांना कुणबी दाखले देणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल केली. त्यांच्या या घोषणेवरून भाजप नेत्या पंकाजा मुंडेंनी टोला लगावला आहे. (Latest Marathi News)

"कोणीतरी घोषणा करून आरक्षण मिळणार नाही. संविधानिक मार्गाने आरक्षण द्यावे लागेल. अशा शब्दांत माजी ग्रामविकास मंत्री तसेच भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावला आहे. तसेच मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे यासाठी अभ्यास गट स्थापन करून योग्य तो आकडा ठरवला पाहिजे, असे मत देखील पंकजा मुंडे यांनी व्यक्त केले आहे.

Pankaja Munde Latest Marathi News
Cm Eknath Shinde On Community marriages: सामुदायिक विवाहसोहळे समाज व काळाची गरज: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

शिवशक्ती परिक्रमाच्या निमित्ताने सांगलीमध्ये पंकजा मुंडे यांचा मोठ्या जल्लोषात भाजपाच्या वतीने स्वागत करण्यात आले. यावेळी शहरातल्या सांगलीचे आराध्यदैवत गणपतीचे पंकजा मुंडे यांनी दर्शन घेतले.

राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर टीकास्त्र सोडताना दिसतायत. मराठ्यांना आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगेंचे आंदोलन सुरू आहे. काल रात्री माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मराठ्यांना कुणबी दाखले देणार असल्याचं म्हटलं.

Pankaja Munde Latest Marathi News
Matoshree : Shiv Sena Latest News : Eknath Shinde यांच्याविरोधात मातोश्रीत जोरदार घोषणाबाजी

"मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी शासन कटीबद्ध आहे. पण काही मंडळी दिशाभूल करताहेत. मराठा समाज आणि ओबीसी बांधवांमध्ये मतभेद, तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करताहेत हे दुर्देवी आहे. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला एसईबीसी म्हणून १२ आणि १३ टक्के आरक्षण दिले होते. ओबीसी बांधवांवर अन्याय्य न करता, त्यांच्या आरक्षणाला कुठलाही धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण दिले जाणार आहे.", असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com