Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: शेतकऱ्याच्या मुलीची लग्नात रॉयल एन्ट्री; थेट हेलिकॉप्टरमधून मंडपात, अख्ख्या सांगलीत चर्चा

Farmer daughter wedding: सोशल मीडियावर वारंवार लग्नातील विविध व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी नवरा-नवरीचा डान्स असतो तर कधी हाणामाराही. मात्र सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ काहीसा हटके आहे.

Tanvi Pol

Mandap helicopter arrival: आर्थिक सुबत्ता आल्याने शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावले आहे. अशातच आता सांगलीच्या विटयातील एका शेतकऱ्याने आपल्या मुलीची लग्नावेळी एंट्री चक्क हेलिकॉप्टरमधून करून मंगल कार्यालयापर्यंत नव्हरी मुलाला वाजत - गाजत आणले. मात्र या नवरी-नवरदेवाची हेलिकॉप्टरमधून झालेली एंट्रीची चर्चा मात्र संपूर्ण सांगली जिल्ह्यात आहे

आपल्या मुलीचे लग्न (Wedding) सर्वांच्या आठवणीत राहावे, यासाठी आपण हा निर्णय घेतल्याचे या वधूपिता अनंत लक्ष्मण माळी यांनी सांगीतले. विटा शहरातील अनंत लक्ष्मण माळी या प्रगतशील शेतकऱ्याने आपली कन्या अनुजा हिचा चिंचवड पुणे येथील चिरंजीव परिमल शंकर कोरे यांच्याशी होणारा विवाह सोहळा नातेवाईकांसह सर्वांच्या कायम आठवणीत राहावा

या सर्व कारणांसाठी शेतकरी अनंत माळी यांनी आपल्या मुलीच्या विवाहात काहीतरी हटके करण्याचे मनी निश्चित केले होते. त्यामुळे नवरी अनुजा आणि नवरदेव चिरंजीव परिमल यांची हेलिकॉप्टरने मंगल कार्यालयाच्या प्रवेशद्वारात हेलिकॉप्टरमधून एंट्री करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. वडिलांनी मुलीच्या लग्नात हेलिकॉप्टर आणले.

त्यानुसार वधू-वराची एंट्री थेट विटयातील श्री मंगल कार्यालयापर्यंत आली. लग्नसोहळा(Wedding) मोठ्या थाटामाटात आणि दिमाखात पार पडला. मात्र या नवरी-नवरदेवाची हेलिकॉप्टरमधून झालेली एंट्रीची चर्चा मात्र संपूर्ण सांगली जिल्ह्यात आहे.

टीप: लग्नातील हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pandharpur : विठुरायाच्या पद स्पर्शासाठी ५ किमीपर्यंत लांबच लांब रांगा | VIDEO

Maharashtra Live News Update: भारंगी नदीत वृद्धाने घेतली उडी; घटना सीसीटीव्हीच्या कॅमेऱ्यात कैद

Hindi Language Row: आर्थिक गणित जुळवण्यासाठी व्यापाऱ्यांना त्रास, खंडणी नाही दिली म्हणून...; प्रताप सरनाईकांचे मनसैनिकांवर गंभीर आरोप|VIDEO

Nashik Crime : लूटमारीच्या उद्देशातून हत्या; चामर लेणी येथील ट्रक चालकाच्या खुनाचा उलगडा

Pune MNS : 'ठाण्याचा वाघ गुजरातच्या पिंजऱ्यात'; पुण्यात मनसेचं आंदोलन, एकनाथ शिंदेंचा केला निषेध

SCROLL FOR NEXT