Viral Video Saam TV
व्हायरल न्यूज

Viral Video : अवकाळी पावसामुळे नुकसान झाल्याने शेतकरी ढसाढसा रडला; हृदयद्रावक व्हिडिओ व्हायरल

Farmer Crying Viral Video : पाऊस ओसरल्यावर कष्टाने वाढवलेल्या शेताची पाहाणी करण्यासाठी शेतकरी तेथे पोहचला तेव्हा आपलं शेत पाहून तो ढसाढसा रडू लागला. मोठ मोठ्याने ओरडत या शेतकऱ्याने आक्रोश व्यक्त केलाय.

Ruchika Jadhav

राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये ऐन उन्हाळ्यात अवकाळी पाऊस बरसत आहे. पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. शेतीचं नुकसान झाल्याने बळीराजावरील कर्जाचा भार आणखी वाढला आहे. अशात एका शेतकऱ्याचा हृदयद्रावक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, अवकाळी पाऊस आल्याने कांद्याच्या शेतात संपूर्ण पाणी भरलं आहे. कांदा पूर्णता भिजला आहे. पाऊस ओसरल्यावर कष्टाने वाढवलेल्या शेताची पाहाणी करण्यासाठी शेतकरी तेथे पोहचला तेव्हा आपलं शेत पाहून तो ढसाढसा रडू लागला. मोठ मोठ्याने ओरडत या शेतकऱ्याने आक्रोश व्यक्त केलाय.

निसर्गाने पडलेल्या पावसाने राज्यातील अनेक शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला आहे. मोठ्या मेहनतीने काळ्या मातीत घाम गाळून शेतकरी शेती करतो. संपूर्ण जगाचा तो पोशींदा असतो. मात्र निसर्गच त्याची साथ देत नाही त्यामुळे तो खचून जातो. अशा घटनांमुळे जास्त कर्जबाजारी होऊन शेतकरी आत्महत्येच्या घटना मोठ्याप्रमाणावर वाढल्या आहेत.

७ दिवसांपूर्वी शेतकऱ्यांच्या भीषण परिस्थितीचा हा व्हिडिओ @insta_king_mh42 या इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट करण्यात आलाय. हा व्हिडिओ पाहून प्रत्येक व्यक्तीच्या डोळ्यात अश्रू दाटत आहेत. यावर नेटकरी देखील विविध प्रतिक्रिय देत आहेत. शेतकरी हा देशाचा जगाचा पोशिंदा आहे खूप वाईट झालं, असं एकाने कमेंटमध्ये म्हटलं आहे.

तर आणखी एकाने शेतकऱ्याचे दुःख समजणारा एकही नेता नाही महाराष्ट्रमध्ये, अशी खंत व्यक्त केली आहे. हे दुःख फक्त एक शेतकरी समजू शकतो सोन्याचा घास तोंडात आलेला गेला, हा निसर्ग आहे त्याच्या पुढे कुणिच काही करू शकत नाही, अशा कमेंट या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी केल्या आहेत.

तसेच शेतकऱ्यांना तात्काळ कर्जमाफी किंवा नुकसानभरपाई द्यावी असंही अनेकांनी कमेंटमध्ये म्हटलं आहे. राज्यात सध्या लोकसभा निवडणुका सुरू आहेत. सर्व पक्ष आपल्या प्रचारात व्यस्त आहेत. तर दुसरीकडे अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या आयुष्यात थैमान घातलं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आता नुकसान भरपाई केव्हा मिळणार असा प्रश्न शेतकरी विचारतायत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुणे शहरातील आणखी एक पूल पाण्याखाली

Pune Crime News : पुणे हादरलं !सासरवाडीत जाऊन पतीने केली पत्नीची हत्या; धक्कादायक कारण समोर

Shengdana Chikki: श्रावणात खास बनवा शेंगदाणा चिक्की, महिनाभर खाता येईल

Raigad To Arnala Fort: रायगड किल्ल्यावरून अर्नाळा किल्ल्यापर्यंत प्रवास कसा कराल? जाणून घ्या प्रमुख टप्पे आणि टिप्स

Nag Panchami 2025: नाग पंचमीला घरी पूजा कशी करावी?

SCROLL FOR NEXT