आता मार्केटमध्ये 350 रुपयांची नोट येणार असल्याचा दावा करण्यात आलाय...नोट कशी असेल याचाही फोटो सोबत जोडण्यात आलाय... हे नोटांचं बंडल पाहा...लालसर रंग असलेली ही नोट दाखवण्यात आलीय...पण, खरंच आता चलनात 350 रुपयांची नोट येणार आहे का...? कारण, पैशांचा विषय महत्त्वाचा आहे...आणि नवीन नोट बाजारात येणार असेल तर त्याची माहिती सांगणं गरजेचं आहे...त्यामुळे याची सत्यता जाणून घेण्यासाठी आम्ही पडताळणी सुरू केली..
हा मेसेज आणि सोबत नोटही व्हायरल होत असल्याने आम्ही याची पडताळणी सुरू केली...याबाबत अधिकृत माहिती आरबीआयकडूनच मिळू शकते...त्यामुळे आम्ही याची माहिती आरबीआयकडून मिळवण्याचा प्रयत्न केला...याबाबत कोणती अधिसूचना जारी केलीय का हे पाहिलं...मात्र, 350 रुपयांच्या नोटेबाबत कुठेही माहिती मिळाली नाही..
350 रुपयांची नोट मार्केटमध्ये आलेली नाही
RBIकडून 350 रुपये नोटेची अधिकृत अधिसूचना नाही
350 रुपयांची बनावट नोट बनवण्यात आलीय
दिशाभूल करण्यासाठी 350 नोटांचं बंडल व्हायरल
350 रुपयांची नोट ही पूर्णपणे बनावट आहे...रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 350 ची नवीन नोट जारी करण्याबाबत कोणतीही अधिकृत अधिसूचना जारी केलेली नाही...त्यामुळे आमच्या पडताळणीत 350 रुपयांची नोट चलनात येणार असल्याचा दावा असत्य ठरलाय