Fake RBI tax message goes viral; authorities confirm it as a financial scam and urge citizens to stay alert. saam tv
व्हायरल न्यूज

Fact Check: बँकेतून 1 लाख रुपये काढण्यासाठी 7500 रूपयेचा टॅक्स भरावा लागणार?

Rbi Alert Fake Tax Message Bank Scam India: सोशल मीडियावर आणि मेसेजिंग प्लॅटफॉर्मवर सध्या भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) किंवा एबीआय (ABI)च्या नावाने एक पत्र मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या पत्रामध्ये नागरिकांना आधी कर भरल्यास त्यांच्या खात्यात लाखो रुपये जमा केले जातील,असा दावा करण्यात आला आहे.मात्र हा दावा पूर्णपणे खोटा आणि दिशाभूल करणारा असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Omkar Sonawane

व्हायरल पत्रात संबंधित व्यक्तीच्या खात्यात 11 लाख जमा होणार होते, मात्र व्यवहार अयशस्वी झाल्यामुळे पेमेंट थांबवण्यात आल्याचे सांगितले जाते. त्यानंतर "परतावायोग्य कर" म्हणून 17,500 भरण्याची मागणी केली जाते. तसेच कर भरल्यानंतर अवघ्या 10 मिनिटांत 1,06,800 खात्यात जमा होतील, असे आमिषही दाखवले जाते. यासाठी एका बँक खात्याचा तपशील देत तातडीने पैसे भरण्यासाठी दबाव टाकला जातो. यापूर्वीही अशाच प्रकारे 1 लाख मिळवण्यासाठी 7,500 कर भरा असा दावा करणारे संदेश आणि ईमेलही व्हायरल झाले होते.

व्हायरल सत्य

केंद्र सरकारच्या पीआयबी फॅक्ट चेकने या दाव्याची पडताळणी केली असता, हे पत्र पूर्णपणे बनावट असल्याचे स्पष्ट केले आहे. आरबीआय कोणत्याही व्यक्तीला पैसे मिळवून देण्यासाठी किंवा बक्षीस, लॉटरी, निधी अथवा इतर कोणत्याही कारणासाठी आधी कर किंवा शुल्क भरण्यास सांगत नाही. आरबीआयनेही वारंवार स्पष्ट केले आहे की, मध्यवर्ती बँक कोणत्याही व्यक्तीच्या नावाने बँक खाते चालवत नाही आणि फोन, एसएमएस, ईमेल किंवा पत्राद्वारे पैसे मागत नाही.

अशा फसवणुकीपासून कसे राहाल सुरक्षित?

आरबीआयच्या नावाने पैसे जमा करण्यास सांगणाऱ्या कोणत्याही संदेशावर विश्वास ठेवू नका.

अनोळखी व्यक्ती किंवा खात्यात कोणतेही पैसे ट्रान्सफर करू नका.

कोणत्याही लिंकवर क्लिक करण्यापूर्वी तिची सत्यता तपासा.

आरबीआयशी संबंधित माहिती केवळ अधिकृत वेबसाइटवरूनच मिळवा.

फसवणुकीचा संशय आल्यास तात्काळ सायबर क्राईम पोर्टल किंवा जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार करा.

आरबीआयच्या नावाने आधी कर भरा आणि नंतर लाखो रुपये मिळवा असा दावा करणारे पत्र, ईमेल किंवा मेसेज पूर्णपणे फेक आहेत.अशा आमिषांना बळी पडू नका आणि कोणतीही आर्थिक व्यवहार करण्यापूर्वी माहितीची खातरजमा करा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: आताचं हिंदुराष्ट्र आमच्या संकल्पनेतलं नव्हत - ठाकरे

Coronavirus: महाराष्ट्र पुन्हा कोरोनाची एन्ट्री; 3 वर्षानंतर रुग्ण का आढळत आहेत?

झणझणीत मटकीचा ठेचा तुम्ही कधी खाल्ल्याय का? एकदम जबरदस्त लागते चव

Nashik Crime: आदल्या २० वर्षीय तरुणीची धारदार शस्त्राने हत्या, दुसऱ्या दिवशी आरोपीची आत्महत्या; दोन हत्याकांडानं नाशिकमध्ये खळबळ

Chia seeds: सकाळ की संध्याकाळ? वजन कमी करण्यासाठी कधी खावेत चिया सिड्स?

SCROLL FOR NEXT