हा फोटो आहे मुंबईच्या महापौर रितू तावडे यांचा...आणि यांच्या हातातील घड्याळ हे तब्बल 1 कोटींचं असल्याचा दावा करण्यात आलाय...सोशल मीडियावर हा फोटो आणि मेसेज प्रचंड व्हायरल होतोय...त्यामुळे चर्चांना उधाण आलंय...खरंच रितू तावडे यांच्या हातातील दिसणारं हे घड्याळ 1 कोटींचं आहे का...? महापौर झाल्यानंतर त्यांनी हे घड्याळ घेतल्याचा दावा करण्यात आलाय...त्यामुळे सोशल मीडियावर पोस्टचा पाऊस पडलाय...
महापौरांच्या हातात महागडं घड्याळ, यलो गोल्ड रोलेक्स डेटोना लाईट डायल याची रिटेल किंमत 60 ते 70 लाख. भारतात मार्केटप्रमाणे 1 कोटीपेक्षा जास्त किंमत.
हा मेसेज व्हायरल होतोय. आणि यावरून बऱ्याच कमेंट केल्या जातायत...त्यामुळे रितू तावडे महापौरपदी विराजमान झाल्यानंतर महिनाभराच्या आतच हातातील घड्याळामुळे वादात सापडल्यायत...काहींनी तर महापौर झाल्या झाल्या हे घड्याळ घेतल्याचा दावा केलाय...पण, खरंच मुंबईच्या महापौर एवढं महागडं घड्याळ घालतात का...? हा विषय चर्चेचा असल्याने आमच्या व्हायरल सत्य टीमने पडताळणी सुरू केली...त्यावेळी याबाबत रितू तावडेंनीच स्पष्टीकरण दिलंय...
ही पोस्ट पूर्णपणे खोटी व दिशाभूल करणारी आहे. माझ्या हातातील घड्याळ मायकल कोर्स कंपनीचं आहे.ते रोलेक्स डेटोनाचे नाही.त्यामुळे लाखो-कोट्यवधींचा प्रश्नच उद्धवत नाही. अफवा पसरवणे हा बेजबाबदारपणा आणि जाणीवपूर्वक बदनामीचा प्रयत्न आहे.अशा खोट्या आरोपांना मी भीक घालत नाही.
स्वत: महापौरांनी त्यांच्या हातातील घड्याळ 1 कोटींचं असल्याचा दावा खोडून काढलाय.. हे घड्याळ रोलेक्स डेटोनाचं नसून मायकल कोर्स कंपनीचे असल्याचं त्यांनी म्हटलंय...त्यांनी जरी दावा फेटाळला असला तरी मुंबई महानगरपालिकेच्या नगरसेवकांच्या मालमत्तेविषयी नागरिकांमध्ये नेहमीच कुतूहल राहिलंय..
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.