Ram Mandir Saam Tv
व्हायरल न्यूज

Fact Check: राम मंदिरातील चोरीचं CCTV फुटेज? दान मोजतानाच नोटांचे बंडल टाकले खिशात?

Ram Mandir Viral Video: एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामध्ये दानाची रोकड मोजत असताना काही लोक पैसे खिशात टाकताना व्हिडिओत दिसतायत. हा व्हिडीओ राम मंदिरातील असल्याचे सांगितले जात आहे. पण सत्य काय ते घ्या जाणून...

Priya More
  • राम मंदिरातील चोरीचा व्हायरल होणारा सीसीटीव्ही व्हिडिओ दिशाभूल करणारा

  • रिव्हर्स सर्चमध्ये हा व्हिडिओ बंगळुरूतील मंदिराचा असल्याचे स्पष्ट

  • व्हिडिओचा अयोध्येतील राम मंदिराशी कोणताही संबंध नाही

राम मंदिरातील चोरीचा व्हिडिओ समोर आल्याचा दावा करण्यात आलाय. दानाची रोकड मोजत असताना काही लोक पैसे खिशात टाकताना व्हिडिओत दिसतायत. पण, खरंच हा व्हिडिओ राम मंदिरातील चोरीचा आहे का. याची आम्ही पडताळणी केली. त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहुयात...

या व्हिडिओत बघा, मंदिरात आलेली देणगी चोरत असल्याचं या व्हिडिओत दिसतंय. टेबलावर ठेवलेल्या नोटांचे बंडल खिशात घालत असल्याचं दिसत असून, ही चोरी राम मंदिरातील असल्याचा दावा करण्यात आलाय. पण, खरंच हा व्हिडिओ अयोध्येतील राम मंदिरातील आहे का? याची आम्ही पडताळणी सुरू केली.

सध्या अयोध्येतील राम मंदिरातून तब्बल 60 किलो चांदीच्या विटा गायब झाल्याची माहिती समोर आलीय. तसंच रोकडही चोरीला गेल्याचा आरोप करण्यात आलाय. त्यामुळे आता हा व्हिडिओ व्हायरल होत असून, अयोध्येतील राम मंदिरातला असल्याचा दावा केलाय. अनेकांनी हा व्हिडिओ पाहून संताप व्यक्त केलाय. यामध्ये देणगीचे पैसे मोजतानाच काहीजण नोटा खिशात टाकत असताना दिसतायत.

हा व्हिडिओ मंदिरातलाच असल्याचं स्पष्ट दिसतंय. पण, राम मंदिरातील आहे का? याची आम्ही पडताळणी सुरू केली. या व्हिडिओची माहिती मिळवण्यासाठी आम्ही व्हिडिओ नीट पाहिला. व्हायरल व्हिडिओच्या कीफ्रेम्सचा रिव्हर्स-सर्च केल्यावर, आणखी माहिती मिळाली. तसेच हा व्हिडिओ कधीचा आहे? कुठला आहे? याची माहिती मिळवली. त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहुयात...

व्हायरल व्हिडिओ राम मंदिरातील नाही. हा व्हिडिओ कर्नाटकातील बंगळूरूमधील आहे. गली अंजनेय स्वामी मंदिरातील घटनेचा हा व्हिडिओ आहे. मंदिरात 2024 साली चोरी झाली होती.

राम मंदिरातील कथित देणगी चोरीचे प्रकरण समोर आल्यापासून, हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय. पण, या व्हिडिओचा अयोध्येतील राम मंदिरातील चोरीशी काहीही संबंध नाही. राम मंदिरातून झालेल्या देणगीच्या चोरीचा तपास करण्यासाठी सध्या स्थापन केलेल्या SITतपास करतेय. पण, हा मंदिरातील चोरीचा व्हिडिओ अयोध्येतील राम मंदिरातील असल्याचा दावा आमच्या पडताळणीत असत्य ठरलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीने सांभाळली लंडनमध्ये आंदोलनाची धुरा

गुरांच्या चाऱ्याला तिजोरीचं कुलूप, दुष्काळासोबत चोरीचंही संकट

SCROLL FOR NEXT