Ghost viral video  Saam tv
व्हायरल न्यूज

Fact Check : कपड्यांच्या शोरूममध्ये भूत? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय? VIDEO

Ghost viral video : कपड्यांच्या शोरूममध्ये भूत फिरत असल्याचा दावा करणारा व्हिडिओ व्हायरल होतोय... हे भूत सीसीटीव्हीत चित्रित झाल्याचा दावा केल्यानं भीतीचं वातावरण निर्माण झालंय...पण, व्हिडिओत दिसतंय ते खरं आहे का...? याची आम्ही पडताळणी केली...त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहुयात...

Sandeep Chavan

व्हिडिओत शोरूममध्ये कपडे लावण्यासाठी असलेलं मॅनिकिन स्वत:हून हालतंय...रात्रीच्या वेळी अचानक हे मॅनिकिन हालचाल करत असल्याने हे भूत असल्याचा दावा करण्यात आलाय...हा व्हिडिओ व्हायरल करून कपड्याच्या शोरूममध्ये भूत फिरतंय असे लिहिलं जातंय...मात्र, खरंच या व्हिडिओत दिसत असलेलं हे भूत आहे का...? की दिशाभूल करण्यासाठी व्हिडिओ व्हायरल केलाय...

कपड्याच्या शोरूममध्ये डमी मॅनिकिन अचानक फिरू लागल्याने सगळ्यांनाच आश्चर्य वाटू लागलंय...डमी मॅनिकिन कशी काय हालू लागली...? असे अनेक प्रश्न उपस्थित करत हे भूत असल्याचा दावा करण्यात आलाय...पण, या व्हिडिओची सत्यता जाणून घेण्यासाठी आमच्या व्हायरल सत्य टीमने पडताळणी सुरू केली...याबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी आमच्या टीमने हा व्हिडिओ नीट तपासून पाहिला...त्यावेळी आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहुयात...

व्हायरल सत्य काय?

कपड्याच्या शोरूममधील व्हिडिओ AI निर्मित

लोकांची दिशाभूल करण्यासाठी व्हिडिओ व्हायरल

भूताची भीती दाखवण्याचा व्हिडिओतून प्रयत्न

जगात भूत अस्तित्वातच नाही

हा व्हिडिओ दाखवून लोकांना घाबरवण्याचा प्रयत्न आहे...त्यामुळे असे व्हिडिओवर किती विश्वास ठेवायचा...? असे व्हिडिओ व्हायरल केल्यास काय कारवाई होऊ शकते...याबाबत आम्ही अंनिसकडून अधिक माहिती जाणून घेतली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : मुंब्रात इमारतीचा सज्जा कोसलळा, एका महिलेचा मृत्यू

गृहमंत्र्यांचा राजीनामा, २१ जणांचा मृत्यू अन् सोशल मीडियावरील बंदी उठली, नेपाळमध्ये Gen-Z चं आंदोलन मागे

Lal Mathachi Bhaji Recipe : लाल माठाची भाजी आरोग्याला ठरेल फायदेशीर, नेहमी रहाल हेल्दी अन् फिट

Tiger Shroff : टायगर श्रॉफने मुंबईतील आलिशान फ्लॅट विकला, नफा वाचून थक्क व्हाल

आता UPI पेमेंटसाठी मिळणार नवीन पर्याय! या कंपनीने सुरु केली सेवा; सरकारकडून मिळाली मंजुरी

SCROLL FOR NEXT