आता UPI पेमेंटसाठी मिळणार नवीन पर्याय! या कंपनीने सुरु केली सेवा; सरकारकडून मिळाली मंजुरी

Viona Fintech Approval News: आता यूपीआय पेमेंटसाठी तुम्हाला नवीन पर्याय मिळणार आहे. व्हियोना फिनटेक या कंपनीला थर्ड पार्टी प्रोव्हाइडर म्हणून मान्यता देण्यात आली आहे.
 UPI
UPISaam Tv
Published On
Summary

आता यूपीआयला नवे पर्याय

व्हिओना कंपनीने सुरु केलं नवीन अॅप्लिकेशन

NPCI नेदेखील दिली मान्यता

सध्या सर्व गोष्टी ऑनलाइन होतात. फक्त काही मिनिटांत तुम्ही कोणतीही गोष्ट करु शकतात. मग ते जगाच्या कानाकोपऱ्यात कोणाला मेसेज करणं असो किंवा पैसे पाठवणे, अवघ्या काही सेकंदातच सर्व कामे होते. ऑनलाइन पेमेंटसाठी यूपीआय हे प्रभावी माध्यम आहे. देशातील सर्वाधिक लोकसंख्या ही यूपीआय पेमेंटचा वापर करते. यूपीआयबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. आता यूपीआयमध्ये अजून एक प्रोव्हायडरची एन्ट्री होणार आहे.

 UPI
EPFO 3.0: आता ATM आणि UPI द्वारे काढता येणार पीएफचे पैसे; EPFO 3.0 लवकरच होणार लाँच

हैदराबादस्थित स्टार्टअप व्हियोना फिनटेकला NPCI ने मान्यता दिली आहे. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने या व्हियोना फिनटेकला थर्ड पार्टी अॅप्लिकेशन प्रोव्हायडर म्हणून काम करण्याची परवानगी मिळाली आहे. यामुळे वेगाने वाढणाऱ्या यूपीआय म्हणजे युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस इकोसिस्टीममध्ये प्रवेश करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

ग्राम पे (GRAAMPAY) आणि व्हिओना पे (VIYONA PAY) असे दोन अॅप या कंपनीने बनवले आहे. त्यांनी आपल्या प्रेस रिलीजमध्ये सांगितलंय की, या मंजुरीमुळे बँकांसोबत भागीदारी करुन भारतातील टियर २, टियर ३ आणि ग्रामीण भागात डिजिटल पेमेंटचा विस्तार करण्यासाठी मदत होईल.

याबाबत व्हिओना फिटनेटकचे संस्थापक रवींद्रनाथ यारलागुड्डा यांनी सांगितले की, ही मंजुरी शेतकरी, दुकानदार आणि कुटुंबासाठी यूपीआय पेमेंट अधिक सुलभ करण्यासाठी एनपीसीआयने आमच्यावर विश्वास दाखवला आहे. कंपनी शहरी आणि वंचित समुदायासाठी सोपी आर्थिक साधने तयार करण्यावर लक्ष केंद्रित करते.

 UPI
आर्थिक अडचण आलीय? UPI दूर करणार तुमची समस्या, बँकेत न जाता मिळेल Loan

रवींद्रनाथ यारलागुड्डा यांनी सांगितले की, GRAAMPAY हे अॅप शेतकरी, लहान व्यापारी आणि स्थानिक समुदायांना डिजिटल कनेक्शन आणि पेमेंट व्यव्हार करण्यासाठी सक्षण करते. तसेच ई कॉमर्सलादेखील समर्थन करते. गावागावातील उद्योजकांना (VLEs) नेटवर्कमुळे आर्थिक बाबतीत साक्षर बनवते.

 UPI
UPI यूजर्ससाठी गुड न्यूज! NPCI ने वाढवली लिमिट, २४ तासांत करता येणार लाखोंचे व्यवहार

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com