Tiger Shroff : टायगर श्रॉफने मुंबईतील आलिशान फ्लॅट विकला, नफा वाचून थक्क व्हाल

Tiger Shroff Sells Mumbai Apartment : बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफने मुंबईतील आलिशान अपार्टमेंट विकले आहे. त्याला कोट्यवधींचा नफा झाला आहे.
Tiger Shroff Sells Mumbai Apartment
Tiger ShroffSAAM TV
Published On
Summary

टायगर श्रॉफचा अलिकडेच 'बागी 4' चित्रपट रिलीज झाला आहे.

टायगरने नुकतेच आपले आलिशान अपार्टमेंट विकले आहे.

टायगर श्रॉफने मुंबईतील घर विकून कोट्यवधींचा नफा कमावला आहे.

बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ (Tiger Shroff) सध्या त्याचा चित्रपट 'बागी 4'मुळे चांगलाच चर्चेत आहे. 'बागी 4'ने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. 'बागी 4' ॲक्शन चित्रपट असून ए. हर्ष दिग्दर्शित आहे. अशात आता टायगर श्रॉफ एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आला आहे. टायगरने मुंबईतील घर विकून कोट्यवधींचा नफा कमावला आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, टायगर श्रॉफने मुंबईतील खार येथील त्याचे अपार्टमेंट तब्बल 15.6 कोटी रुपयांना विकले आहे. यामुळे अभिनेत्याला तब्बल 31% नफा झाला आहे. टायगरने 2018मध्ये हा फ्लॅट 11.62 कोटी रुपयांना खरेदी केला होता.93.60 लाख रुपये स्टॅम्प ड्युटी आणि 30,000 रुपये नोंदणी शुल्क यांचा व्यवहारात समावेश आहे.

टायगर श्रॉफचा हा फ्लॅट रुस्तमजी पॅरामाउंटमध्ये होता. घराचा संपूर्ण व्यवहार सप्टेंबर 2025 मध्ये झाला. या लग्जरी अपार्टमेंटला तीन कार पार्किंग आहेत. तसेच कार्पेट एरिया 1,989.72 चौरस फूट आहे.

'बागी 4' चित्रपट कलेक्शन

'बागी 4' चित्रपट 5 सप्टेंबरला थिएटरमध्ये रिलीज झाला. चित्रपटात टायगर श्रॉफसोबत सोनम बाजवा,संजय दत्त आणि हरनाज संधू हे मुख्य भूमिकेत आहेत. बागी फ्रँचायझीचा 'बागी 4' सीक्वल आहे. संजय दत्त चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेत दिसत आहे. हरनाज संधू हिने 'बागी 4' मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. मीडिया रिपोर्टनुसार, 'बागी 4' 200 कोटींच्या बजेटमध्ये बनवण्यात आला आहे. 'बागी 4' चित्रपटने आतापर्यंत 35.50 कोटी रुपये कमावले आहे.

Tiger Shroff Sells Mumbai Apartment
Ashok Ma. Ma : नात्यातील दुरावा संपला; अशोक मामा अन् त्यांच्या बहिणीची भेट, पाहा VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com