Dhanshri Shintre
सध्या भारतीय ऑटोमोबाईल बाजारात विविध ब्रँडच्या असंख्य कार उपलब्ध असून, ग्राहकांसाठी निवडीचे अनेक पर्याय उपलब्ध झाले आहेत.
हिंदुस्तान मोटर्सने बनवलेली अॅम्बेसेडर ही देशातील पहिली कार ठरली असून, भारतीय ऑटोमोबाईल इतिहासात तिचे विशेष स्थान आहे.
मॉरिस ऑक्सफर्ड सिरीज III वर आधारित ही कार हिंदुस्तान मोटर्सने तयार केली होती आणि ती भारतीय रस्त्यांवर लोकप्रिय ठरली.
देशातील पहिल्या कार हिंदुस्तान अॅम्बेसेडरची लोकप्रियता आजही कायम असून, लोकांमध्ये तिच्याबद्दल विशेष आकर्षण आहे.
हिंदुस्तान अॅम्बेसेडर कार पेट्रोल आणि डिझेल दोन्ही प्रकारच्या इंधनावर चालवता येण्याची सुविधा देत होती.
पेट्रोल व्हेरिएंटसाठी हिंदुस्तान अॅम्बेसेडरची किंमत ४.३७ लाख ते ५.४२ लाख रुपयांच्या दरम्यान निश्चित करण्यात आली होती.
हिंदुस्तान अॅम्बेसेडरच्या डिझेल व्हेरिएंटची किंमत ४.५४ लाख रुपयांपासून सुरू होऊन ६.४० लाख रुपयांपर्यंत पोहोचत असे.
देशातील पहिली कार १८९७ मध्ये रस्त्यावर आली होती आणि ती चार लोकांनी खरेदी करून त्यांचा प्रवास सुरू केला होता.
१९५७ साली भारतीय रस्त्यांवर प्रतिष्ठित हिंदुस्तान अॅम्बेसेडर कार लाँच झाली, जी काळाच्या ओघात प्रसिद्धी मिळवणारी ठरली.