Donkey farming unit under the National Livestock Mission scheme in India Saam Tv
व्हायरल न्यूज

गाढवं पाळा, 50 लाख मिळवा? गाढवं पाळण्यासाठी केंद्र सरकार देणार पैसे?

Fact Check: आम्ही व्हायरल व्हिडिओची पडताळणी करतो आणि सत्य समोर आणतो...आता एक व्हिडिओ व्हायरल होतोय...गाढव पाळण्यासाठी सरकार 50 लाख रुपये देतं असा दावा करण्यात आलाय...पण, खरंच सरकारची अशी योजना आहे का...? याची आम्ही पडताळणी केली...त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहुयात...

Sandeep Chavan

आता गाढवं पाळणाऱ्यांना सरकार 50 लाख रुपये देणार आहे...होय, अशी सरकारची नवीन योजना असल्याचा दावा करण्यात आलाय...या योजनेचा लाभ कुणीही घेऊ शकतो असा दावा करण्यात आलाय...पण, खरंच सरकारची अशी योजना आहे का...? गाढवं पाळणाऱ्यांसाठी सरकार एवढे पैसे का देणार आहे...? यामागचं काय कारण असू शकतं...याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे...त्याआधी मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहुयात...

2019 च्या आकडेवारीनुसार देशात 1.23 लाख गाढवं शिल्लक आहेत...2012 पासून गाढवांची संख्या सुमारे 60 टक्क्यांनी घटलीय...पण, खरंच केंद्र सरकार आता गाढवं पाळणाऱ्यांना 50 लाख रुपये देतं का...? हे जाणून घेण्यासाठी आमच्या टीमने पडताळणी सुरू केली...हे खरं असेल तर चांगलीच गोष्ट आहे...त्यामुळे आमच्या टीमने पडताळणी करून माहिती मिळवली...त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहुयात...

राष्ट्रीय पशुधन मिशन NML असं योजनेचं नाव

गाढव पाळणाऱ्यांना सरकार 50 लाख रुपये देतं

अनुदानासाठी सरकारच्या अटी असून, अर्ज भरावा लागतो

गाढव पाळण्यासाठी 50% अनुदान केंद्र सरकार देतं

एकूण खर्च 1 कोटी असल्यास सरकार 50 लाख मिळतात

हे अनुदान मिळवण्यासाठी एका युनिटमध्ये किमान 50 मादी आणि 5 नर गाढवं असणं आवश्यक आहे...या योजनेअंतर्गत, सरकार 50 लाखांपर्यंत अनुदान देतं...हा लाभ फक्त स्थानिक जातीच्या गाढवांसाठीच लागू होतो...परदेशी जातींना नाही...अनुदान शेतकऱ्याला दोन हप्त्यांमध्ये दिले जाते...गाढव संगोपनाला प्रोत्साहन देण्यासाठी सरकार ही योजना राबवत आहे...योजनेसाठी अर्ज कसा करायचा हेदेखील पाहुयात...

योजनेसाठी अर्ज कसा करावा?

अधिकृत वेबसाईट nlm.udyamimitra.in वरुन अर्ज करू शकता

बँकेकडून कर्ज घेऊन प्रोजेक्ट सुरू करू शकता

अनुदान थेट तुमच्या बँक खात्यात येईल

योग्य योजना, युनिट आकार निवडल्यास 50 लाखांची मदत मिळेल

गाढविणीचं दूध आणि त्यापासून बनवलेले उत्पादनांना सरकार प्रोत्साहित करतंय... गाढविणीच्या दूधात पौष्टिक घटक असतात. त्वचेसाठी उत्तम असून रोग प्रतिकारकशक्ती वाढवते. तसंच रोजगारही उपलब्ध होतो...त्यामुळे आमच्या पडताळणीत गाढवं पाळल्यास 50 लाख रुपये मिळतात हा दावा सत्य ठरलाय...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : मार्च महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात विदर्भातील पारा चाळीशीपार

UPSC Topper: आधी MBBS; डॉक्टर सोडून दिली UPSC; देशात रँक १ मिळवणारे अनुज अग्निहोत्री आहेत तरी कोण?

Upit Recipe: सकाळी नाश्त्यासाठी बनवा झटपट आणि चविष्ट उपीट, जाणून घ्या सोपी रेसिपी

आता रात्रभर चालणार बार; 5-स्टार हॉटेलबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय, जाणून घ्या नवे नियम

Saturday Horoscope: अनावश्यक खर्च टाळा, मेहनतीचे फळ मिळेल; या ४ राशींसाठी शनिवार ठरणार लकी

SCROLL FOR NEXT