Earphones Side Effects Canva
व्हायरल न्यूज

Fact Check : एअरफोन वापरल्याने चेहर्‍याला मारू शकतो लकवा? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य? पाहा व्हिडिओ

Saam Tv

मुंबई : एअरफोन, इअरबड्स तुम्ही वापरत असाल तर ही बातमी पाहा आणि सावध व्हा... कारण, एअरफोनमुळे तुमच्या चेहर्‍याला लकवा मारू शकतो... चेहर्‍याला लखवा मारल्याने तोंड वाकडं होऊन बोलायला आणि जेवायलाही त्रास होऊ शकतो. त्यामुळे हा दावा खरा आहे का? याची आम्ही पडताळणी सुरू केली... पण त्याआधी मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहुयात...

व्हायरल मेसेजमध्ये दावा करण्यात आला आहे की,'एअरफोन, ईयरबडच्या अतिवापरामुळे चेह-याला लकवा मारू शकतो.एअरफोन अधिक वेळ वापरल्याने बहिरेपणा, डोकेदुखी, टेन्शन, हृदयविकाराचा त्रास होऊ शकतो'. हा दावा केल्याने याची पडताळणी करणं गरजेचं आहे. प्रत्येकाकडे मोबाईल असल्याने या दाव्याबाबत खरं काय हे जाणून घेण्यासाठी आमच्या व्हायरल टीमने डॉक्टरांशी संपर्क साधला. त्यांना व्हायरल मेसेज दाखवला आणि एअरफोनमुळे चेहर्‍याला लखवा मारू शकतो का हे जाणून घेतलं.

व्हायरल सत्य काय?

एअर फोन आणि इअरबडच्या वापरामुळे चेह-याला लकवा मारत नाही. हेडफोन, इअरबडच्या अतिवापरामुळे कानाचे त्रास होतात. कानदुखी, बहिरपेणा येणं, कानाचा एकाबाजूला भाग दुखणे आहे. टेन्शन, डोकं दुखणे असे परिणाम जाणवतात. कानात फंगस होणे यासारखे आजार होऊ शकतात. एअरफोनमुळे चेहर्‍याला लखवा मारत नाही हे स्पष्ट झालं मात्र, कानाचे त्रास उद्भवतात... त्यामुळे काय काळजी घ्यावी पाहुयात.

एअरफोन वापरताना काय काळजी घ्यावी?

कमीत कमी वेळ हेडफोन किंवा एअरफोनचा वापर करावा. एअरफोनचा आवाजात कमी ठेवावा. एअरबड्स कानात व्यवस्थित बसणारे वापरावेत. एअरबड, एअरफोन हे जास्त वापरल्याने त्याचे गंभीर परिणाम जाणवतात. त्यामुळे त्याचा वापर कमी प्रमाणात करावा. कोरोना काळात ऑनलाईन काम करताना बरेचजण एअरफोन वापरत होते. त्यामुळे १० पैकी २ जणांना कानाचा त्रास जाणवत होता. एअरफोनचे अनेक दुष्परिणाम असल्यामुळे गरजेपुरताच एअरफोनचा वापर करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope Today : कोणाच्या राशीत आज काय? वाचा राशीभविष्य

Mrunal Thakur: आंखों ही आंखों में इशारा हो गया...

Bhumi Pednekar: भूमी पेडणेकरच्या नव्या लूकची चर्चा, नेटकऱ्यांनी उर्फीसोबत केली तुलना

Heart Attack Treatment : हार्ट अटॅकवर उपचार तुमच्या जवळच्या रुग्णालयात; मोफत औषध उपलब्धही होणार, जाणून घ्या सविस्तर माहिती

Dream Recorder: आता तुमचं स्वप्न रेकॉर्ड होणार? प्लेबॅक करून पुन्हा पाहता येणार स्वप्न? शास्त्रज्ञांनी शोधलं मशीन; पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT