Viral Video saam tv
व्हायरल न्यूज

Viral Video: देव तारी त्याला कोण मारी! 13व्या मजल्यावरुन पडला तरी वाचला, थरारक व्हायरल VIDEO समोर

Vikroli Viral News: बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या 13व्या मजल्यावरून एका मजुराने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. थरारक प्रसंगाने परिसरात खळबळ माजली असून विक्रोळी पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Dhanshri Shintre

विक्रोळीच्या कन्नमवार नगरमध्ये बुधवारी एक धक्कादायक घटना घडली. बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या 13व्या मजल्यावरून एका मजुराने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र, स्थानिक नागरिकांच्या वेळीच हस्तक्षेपामुळे त्याचा जीव वाचला. थरारक प्रसंगाने परिसरात खळबळ माजली असून विक्रोळी पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. सुदैवाने मोठा अनर्थ टळला आहे, अशी स्थानिकांनी प्रतिक्रिया दिली आहे.

विक्रोळीच्या कन्नमवारनगरमध्ये 'देव तारी, त्याला कोण मारी' म्हण पुन्हा सिद्ध झाली आहे. ५७ क्रमांकाच्या एका बांधकाम सुरू असलेल्या इमारतीत एक कामगार आत्महत्येच्या प्रयत्नात १३व्या मजल्यावरून उडी मारण्याचा प्रयत्न करत होता. विशेष म्हणजे त्याने एकदा नाही, दोनदा नाही तर तब्बल तीन वेळा उडी मारली. मात्र, प्रत्येक वेळी सुरक्षेसाठी लावलेल्या जाळ्यात तो अडकला आणि त्याचा जीव वाचला. या थरारक घटनेने परिसरात खळबळ उडाली असून, सुदैवाने मोठा अनर्थ टळला आहे.

बिरजूप्रसाद रमेश बनरवा, एक कामगार, मानसिक तणावाचा सामना करत होता. काल, विक्रोळीतील ५७ क्रमांकाच्या इमारतीच्या १३व्या मजल्यावरून त्याने उडी मारली. मात्र, तो आठव्या मजल्यावर सुरक्षेसाठी लावलेल्या जाळ्यात अडकला. तिथूनही त्याने दुसरी उडी मारली आणि तिसऱ्या मजल्यावरील जाळीत अडकला. तिथूनही उडी घेतल्यानंतर शेवटी तो खाली स्थानिकांनी धरलेल्या जाळ्यात पडला आणि आश्चर्यकारकपणे बचावला. या थरारक घटनेने सर्वांनाच धक्का बसला असून, स्थानिकांच्या वेळीच केलेल्या मदतीमुळे मोठा अनर्थ टळला.

बिरजूप्रसाद रमेश बनरवा या तरुणाला वाचवल्यानंतर त्याला गोरखपूर, उत्तरप्रदेशातील त्याच्या गावी पाठवण्यात आले. या थरारक घटनेदरम्यान बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. सुदैवाने, हा तरुण सुखरूप असून त्याला कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आले आहे, त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यात तरुण संरक्षण जाळीवर अडकलेला दिसतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Washim Accident: वाशिममध्ये भीषण अपघात! १३ चिमुकल्यांना घेऊन जाणारी व्हॅन खड्ड्यात पलटली अन् पुढे...

katrina kaif: कतरिना कैफपूर्वी ‘या’ अभिनेत्रींनी चाळीशीत घेतलेला आई होण्याचा निर्णय

Maharashtra Live News Update: नाशिकमध्ये आदिवासींची महापंचायत

Virat Kohli: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सीरीज खेळण्यास किंग कोहलीचा नकार, वनडे क्रिकेटमधून विराट घेणार निवृत्ती?

Breaking : मोठी बातमी! लडाख हिंसाचारात ४ जणांचा मृत्यू; अखेर सोनम वांगचुक यांना अटक, इंटरनेट सेवाही बंद

SCROLL FOR NEXT