Employees Leave Request  Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral: 'प्लीज ना...' बॉस आणि कर्मचाऱ्याचं व्हॉट्सअप चॅट व्हायरल, सुट्टी मागण्याची गजब आयडिया!

Employees Leave Request Viral On Social Media: प्लीज मॅडम मला सुट्टी द्या, असा एका कर्मचाऱ्याने त्याच्या बॉसला मेसेज केलाय. ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

Rohini Gudaghe

मुंबई : सोशल मीडियावर सध्या एका २५ वर्षीय कर्मचाऱ्याने आपल्या बॉसला सुट्टीसाठी केलेल्या मेसेजचा स्क्रीनशॉट व्हायरल होत आहे. या २५ वर्षीय कर्मचाऱ्याच्या रजेच्या विनंतीबाबतची पोस्ट X अकाउंटवर व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडिया वापरकर्त्यांनी 'जनरेशन Z' मधील तरूणांनी कॉर्पोरेट कल्चर कसं हाताळावं, याबद्दल सल्ला दिलाय. आपण या तरूणाने रजेच्या मेसेजमध्ये नेमकं काय लिहिलं होतं, ते पाहू या.

नेमकं काय आहे प्रकरण?

प्राची नावाच्या तरूणीने X सोशल मीडिया अकाउंटवर कॅप्शनसह एक स्क्रीनशॉट पोस्ट केला होता. कॅप्शनमध्ये तिने म्हटलं होतं की, ती २५ "कल्पना करा 25 वर्षांची आहे आणि तरीही सुट्टीसाठी 'आई कार्ड' वापरत आहे. खरं तर हे खूप हास्यास्पद (Employees Leave Request) आहे, परंतु यासाठी जनरेशन Z च्या लोकांना सल्ला देखील नेटकऱ्यांनी दिलाय.

व्हायरल पोस्ट

पोस्टमध्ये दिसतंय की, कर्मचाऱ्याने म्हटलंय ती, नमस्कार मॅडम, शुभ दुपार! मला या शनिवारी अर्ध्या दिवसाची सुट्टी हवीय. मला माहित आहे की, कामाच्या दिवशी सुट्टी मिळणं कठीण आहे, तरी देखील कृपया मला अर्ध्या दिवसाची सुट्टी (Viral Post) द्या. कारण मला वैयक्तिक कार्यक्रमासाठी माझ्या कुटुंबासोबत जायचं आहे. पुढे विनवणी केलीय की, प्लीज मॅडम मला खरोखरच सुट्टी हवी आहे, अन्यथा माझी आई मला मारून टाकेल. यासोबतच त्याने रडके इमोजी पोस्ट केलेले होते.

खरं तर जास्त काही गंभीर हेतु नसलेल्या या पोस्टला मात्र सोशल मीडियावर भरपूर प्रतिसाद मिळालेला आहे. जनरेशन Z च्या लोकांना एक विशेष सल्ला देखील दिला गेलाय. अनेक जणांनी म्हटलंय की, जिथे सुट्टीसाठी रडावं लागेल, अशा संस्थेसाठी केव्हाही काम करू ( How To Apply Leave Request) नका.

नियम क्रमांक १ ...

जर तुम्ही नोकरी करत असाल तर रजेसाठी कधीही परवानगी मागू नका, तुम्ही (Genz) रजा घेणार आहात हे कळवायला सुरुवात करा. तुमच्याकडे रजा शिल्लक असेल तर तुम्ही त्यास पात्र आहात. कंपनीला तुमची खूपच गरज असल्यास त्यांना तुम्हाला पटवून देण्याचा प्रयत्न करू द्या, मग निर्णय घ्या, असंही दुसऱ्या एका सोशल मिडिया युजरने म्हटलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hair Care Tips: हे 'काळे पाणी' तुमच्या केसांच्या सर्व समस्या करतील मूळापासून दूर, एकदा नक्की ट्राय करुन पाहा

Mumbaicha Raja : 'मुंबईचा राजा...' म्हणू नका! रोहित शर्मानं चाहत्यांना रोखलं, VIDEO

Weight Gain : जेवणाच्या या चुकीच्या सवयींमुळे वाढेल वजन; वेळीच व्हा सावध

Sevai Kheer Recipe : सणासुदीला खास बनवा शेवयांची खीर, एक घास खाताच मन होईल तृप्त

Maharashtra Live News Update: पुण्यातील देविका हाइट्स इमारतीच्या टेरेसवरील टॉवर केबिनला आग

SCROLL FOR NEXT