Woman humiliates cab driver incident saam tv
व्हायरल न्यूज

Viral Video: जास्त ओव्हरस्मार्ट बनू नकोस...! इंग्रजीमध्ये बोलणाऱ्या कॅब ड्रायव्हरला महिलेकडून अपमानादास्पद वागणूक

Woman humiliates cab driver incident: एका टॅक्सी चालकाने प्रवाशांशी संवाद साधताना इंग्रजीत बोलणं सुरू केले. मात्र, या गोष्टीवरून एका महिलेने त्याच्याशी अपमानजनक वागणूक केली.

Surabhi Jayashree Jagdish

आजकाल सोशल मीडियावर बऱ्याच गोष्टी व्हायरल होत असतात. एखादी चुकीची घटना घडली की, लोकं त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करतात. अनेकदा क्षणार्धात तो व्हिडीओ व्हायरल होतो. असाच सध्या एक व्हिडीओ व्हायरल होताना दिसतोय. ज्यामध्ये दोन महिला कॅब ड्रायव्हरचा अपमान करताना दिसतात.

सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होतोय. या व्हिडिओमध्ये एक कॅब ड्रायव्हर त्याच्या प्रवाशाला नम्रपणे सीट बेल्ट लावण्याची विनंती करताना दिसतोय. तो शांतपणे सांगतो की, जर पोलिसांनी गाडी थांबवली तर त्याला दंड भरावा लागेल. मात्र कारमध्ये बसलेल्या प्रवाशांनी त्याचं ऐकण्याऐवजी उलट आवाज चढवला आणि ड्रायव्हरला शिवीगाळ करत अपमानास्पद शब्द वापरले.

नेमकं काय आहे प्रकरण?

दोन महिला गाडी बसल्यानंतर ड्रायव्हर सीटच्या बाजूला बसणाऱ्या महिलेला कॅब ड्रायव्हरने हिंदी भाषेतून सीट बेल्ट लावण्यास सांगितलं. यानंतर त्या महिलेने ऐकलं नाही. तेव्हा त्या ड्रायव्हरने पुढे पोली गाडी थांबवतील त्यामुळे सीट बेल्ट लावा असं इंग्रजीतून सांगितलं. यावेळी महिला प्रवाशाने "ओव्हरस्मार्ट बनू नकोस" आणि "इंग्रजी बोलून शो ऑफ करू नकोस" असं म्हणत ड्रायव्हरची थट्टा केली.

दरम्यान या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून यावर अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. साध्या वाहतूक नियमांचं पालन करण्याची विनंती करणं हा अपमानाचा विषय कसा झाला, असा प्रश्न युझर्सडून विचारला जातोय.

कॅब ड्रायव्हर हे नोकर नाहीत, तर प्रवाशांच्या सुरक्षिततेची जबाबदारी घेणारे व्यावसायिक आहेत. त्यांचं काम केवळ गाडी चालवणं नाही तर प्रवाशांना सुरक्षितपणे त्यांच्या हव्या असलेल्या जागी पोहोचवणं आहे. वाहतूक नियमांचे पालन करणं ही त्यांची कायदेशीर जबाबदारी आहे. त्यामुळे प्रवाशांनी सहकार्य करणं ही त्यांचीही जबाबदारी आहे.

या व्हिडिओवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी प्रवाशाच्या वागणुकीवर नाराजी व्यक्त केली, तर काहींनी ड्रायव्हर या स्थितीत अगदी शांत होता, याचं कौतुक केलंय. ड्रायव्हरने संयम दाखवला, हेच उत्तम आहे, असं मत अनेकांनी व्यक्त केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mayor Race : कल्याण-डोंबिवलीचा महापौर कोण? 3 नावांची चर्चा, मनसेची नगरसेविकाही शर्यतीत आघाडीवर

Eye Yoga Exercise: चष्मा घालवायचा आहे? रोज फक्त 5 मिनिटे करा हा 'आय योगा'

Maharashtra Live News Update : दावोस दौऱ्यामुळे 30 लाख कोटींची गुंतवणूक-CM फडणवीस

Shocking: मुलगा झाल्यामुळे १ लाख मागितले, पैसे न दिल्याने तृतीयपंथीयांना राग अनावर; महिलेवर गोळ्या झाडल्या

Crime News: नवऱ्याची हत्या केली नंतर मृतदेहाजवळ बसून पत्नीनं पाहिला पॉर्न व्हिडिओ; धक्कादायक घटना

SCROLL FOR NEXT