Dog Sings Song Saam TV
व्हायरल न्यूज

Dog Sings Song: काय गायलास भावा! ढोलकीच्या तालावर कुत्र्याने गायलं गाणं; विश्वास बसत नाही मग VIDEO पाहा

Dog Sings Song Video Viral: ढोलकी ज्या तालात वाजवली जाते त्याच तालावर कुत्रा गाणी गात आहेत. सध्या या गाण्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालाय.

Ruchika Jadhav

Viral Video:

गाण्याची आवड प्रत्येकच व्यक्तीला असते. आपल्या आयुष्यात आनंद व्यक्त करताना त्यात गाण्यांची साथ लागते. सुंदर आणि मधूर सूर नसले तरी सर्वचजण कामात असताना किंवा प्रवासात गाणी गुणगुणतात. प्राण्यांना बोलता येत नाही. मात्र त्यांना देखील भावना आहेत आणि त्यांनाही गाणी गावी वाटतात. तुम्हाला खरं वाटणार नाही मात्र सोशल मीडियावर याची प्रचिती आणणारा एक व्हिडीओ समोर आलाय.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक व्यक्ती रात्रीच्यावेळी ढोलकी वाजवत आहे. हा व्यक्ती थोडावेळ ढोलकी वाजवतो आणि त्यानंतर एक कुत्रा त्यावर गाणं गाऊ लागतो. ढोलकी ज्या तालात वाजवली जाते त्याच तालावर कुत्रा गाणी गात आहे. सध्या या गाण्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालाय.

एखाद्या सॅड गाण्याची म्युजीक जशी असते अगदी त्याच पद्धतीने कुत्रा ओरडतो आहे. त्याच्याकडे सूर नाहीत स्वर नाहीत मात्र तरीही त्याने आपल्या आवाजात गाणं गाण्यास सुरुवात केलीये. मुक्या प्राण्यांना बोलता येत नसलं तरी तो हावभाव आणि डोळ्यांनी आपली भाषा, आपल्या भावना समजतात आणि त्या पद्धतीने वागतात.

मुक्या प्राण्यांना पाळणारे अनेक प्राणी मित्र आहेत. अशात सध्याच्या घडीला कुत्रा बहुतेक घरांमध्ये पाहायला मिळतो. असं म्हणतात की कुत्रा हा फार इमानी प्राणी आहे. तो आपल्या मालकाचे नेहमीच संरक्षण करतो. कुत्र्यांशी खेळताना व्यक्ती त्यांना विविध गोष्टी शिकवतात. तसेच तो ज्या व्यक्तींसोबत राहतो त्यांच्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करतो.

सोशल मीडियावर @_.thoughts_in_life._ या इंस्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आलाय. या व्हिडीओ ३ लाखांहून अधिक लाइक्स मिळाले आहेत. व्हिडीओ पोस्ट करत तेरी आवाज मे दर्द है असं कॅप्शन यावर देण्यात आलं आहे. प्राण्यांच्या करामतीचे आजवर अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. मात्र या व्हिडीओने नेटकऱ्यांची मने जिंकली आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India Bangladesh Tour: टीम इंडियाचा बांगलादेश दौरा का झाला रद्द? काय आहे कारण,जाणून घ्या

Shaktipeeth Expressway :'शक्तीपीठ' ठरणार पांढराहत्ती? शेतकऱ्यांचं नुकसान, शेकडो गावांना फटका बसणार; राजू शेट्टींनी सांगितले विकासाचे अडथळे

Satara News: थरारक! साताऱ्यातील खंबाटकी घाटात ट्रकचा जळून कोळसा; वाहतूक ठप्प, VIDEO

IMD Rain Alert : महाराष्ट्रातील कोकण, विदर्भ, मराठवाडासह देशभरात ७ दिवस मुसळधार पावसाचा इशारा

Hindi Language Controversy: मला मराठी येत नाही, ताकद असेल तर महाराष्ट्रातून हाकलून द्या; केडियानंतर राज ठाकरेंना अभिनेत्याचं ओपन चॅलेंज

SCROLL FOR NEXT