Police Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Police Viral Video : पोलिसांचा खतरनाक प्रताप! लाच घेतली अन् पैसे एकमेकांना वाटले; धक्कादायक प्रकार CCTVत कैद, पाहा VIDEO

Delhi traffic police bribe money distribution video viral : दिल्ली पोलिसांचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय. यामध्ये पोलीस कर्मचारी लाच आपापसात वाटून घेताना दिसत आहेत.

Rohini Gudaghe

मुंबई : दिल्लीत ट्रॅफिक पोलीस कर्मचाऱ्यांना लाचेचे पैसे वाटल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यानंतर लेफ्टनंट गव्हर्नर विनय सक्सेना यांनी कडक कारवाई करत तीन वाहतूक पोलिसांना निलंबित केले. व्हायरल झालेले सीसीटीव्ही फुटेज दिल्लीच्या त्रिलोकपुरी सर्कलच्या गाझीपूर भागामधील असल्याचं सांगितलं जातंय . व्हिडिओमध्ये दोन एएसआय आणि वाहतूक पोलिसांचा एक हेड कॉन्स्टेबल दिसत आहे.

दिल्ली पोलिसांचा व्हिडिओ व्हायरल

दिल्लीतील गाझीपूरमध्ये तीन ट्रॅफिक पोलिसांनी पोलीस ठाण्यासमोरील एका झोपडीचे रुपांतर पैसे गोळा करणाऱ्या अड्ड्यात केलंय. व्हायरल झालेल्या सीसीटीव्ही व्हिडिओमध्ये तो पैसे वाटताना दिसत (Delhi traffic police Video) आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच एलजीने या प्रकरणाची दखल घेत कारवाई केली. या प्रकरणी अधिकाऱ्यावर एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला होता. हा व्हिडिओ तुफान व्हायरल होतोय.

लाच घेतल्याचा आरोप

या पोलिसांवर कोंडली कालव्यावरून जाणाऱ्या वाहनचालकांना त्यांच्या झोपडीत बोलावून कागदपत्र नसल्याच्या आधारे चालानची धमकी देऊन लाच घेतल्याचा आरोप आहे. बराच वेळ हा खेळ चालू (viral video) होता. या झोपडीत कोणीतरी सीसीटीव्ही कॅमेरा बसवून पोलिसांची कृती रेकॉर्ड केलीय. हा व्हिडिओ आठवडाभरापूर्वीचा असल्याची माहिती टीव्ही नाईनच्या हवाल्यानुसार मिळत आहे.

कडक कारवाई

हा व्हिडिओ x सोशल मीडिया माध्यमावर कुणाल कश्यप नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात (bribe Video) आलाय. वाहतूक पोलिसांनी गाझीपूर पोलीस ठाण्यासमोरील झोपडीला खंडणीचा अड्डा बनवलाय. बघा कसं लोकांना तिथे आणतात आणि लाच घेतात, मग कमाई आपापसात वाटून घेत आहेत. आरोपी (Viral News) वाहतूक पोलीस कल्याणपुरी सर्कलमधील आहेत, असं कॅप्शन या व्हिडिओला देण्यात आलं होतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IAS TRANSFERS: राज्यातील पाच IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणाची कुठे नियुक्ती वाचा

ED Raids : माजी आयुक्त अनिलकुमार पवारांच्या घरी ईडीचा छापा; संपत्ती जाणून डोळे पांढरे होतील, वाचा स्पेशल रिपोर्ट

Maharashtra Live News Update: ठाण्याच्या नवीन जिल्हाधिकारी म्हणून श्रीमंती अशिमा मित्तल यांची नियुक्ती

Tariff : ट्रम्पचा धक्का, भारताला फटका? कोण-कोणत्या उद्योगांवर होणार परिणाम, जाणून घ्या

Ladki Bahin Yojana : राज्यातील ५० लाख बहिणी अपात्र ठरल्या; काय आहे नेमकं कारण? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT