Delhi Metro Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Delhi Metro Viral Video: किती तो नटापटा! पोरीनं थेट मेट्रो ट्रेनमध्ये उघडलं पार्लर; व्हिडिओ पाहून व्हाल थक्क

Parlor in Delhi Metro: एका व्यक्तीने आपल्या फोनमध्ये तरुणीचा व्हिडिओ रेकॉर्ड केला आहे.

Ruchika Jadhav

Delhi Metro: मेट्रो ट्रेनमधील व्हिडिओ व्हायरल होण्याचं प्रमाण वाढतच चाललं आहे. मेट्रोमध्ये रोज काही ना काही अतरंगी प्रकार पाहायला मिळतो. आता देखील सोशल मीडियावर मेट्रो ट्रेनचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय. या व्हिडिओमध्ये तरुणीने थेट मेट्रो ट्रेनमध्ये केस स्ट्रेटनींग करण्यास सुरुवात केली आहे. एका व्यक्तीने आपल्या फोनमध्ये तरुणीचा व्हिडिओ रेकॉर्ड केला आहे. हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतोय. (Latest Marathi News)

सदर व्हिडिओ हा दिल्ली मेट्रोमधील (Delhi Metro) आहे. या आधी देखील दिल्ली मेट्रोमध्ये एका तरुणीचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. तिच्या हटके फॅशनमुळे तरुणी सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. यासह काही प्रेमी युगुलांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, एक तरुणी मेट्रो ट्रेनमध्ये आपले केस विंचरत आहे. घरी वेळ न मिळाल्याने तरुणी थेट मेट्रो ट्रेनमध्ये हेअर स्ट्रेटनर घेऊन आली आहे. मेट्रोमध्ये असलेल्या इलेक्ट्रीक प्लगला तिने हेअर स्ट्रेटनर लावलं आहे. तरुणी ट्रेनमध्ये उभी राहून स्ट्रेटनींग करतेय. तिची ही करामत पाहून मेट्रोमधील इतर प्रवासी चकित झालेत.

तरुणीच्या या व्हिडिओवर विविध प्रतिक्रिया येत आहेत. आशीष सिंग या व्यक्तीने आपल्या ट्वीटर अकाउंटवर हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. यात त्याने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, 'बस करो रहम करो दिल्ली मेट्रो को...'तर इतर युजर्स देखील या व्हिडिओवर अतरंगी कमेंट करत आहेत.काही व्यक्ती हे पाहून चकित झालेत. तर काहीजण हा व्हिडिओ पाहून लोटपोट हासत आहेत.

फक्त १५ सेकंदाच्या या व्हिडिओवर काही वेळातच लाखोंच्या घराच व्ह्यूव्ज मिळाले आहेत. रोजच्या धावपळीच्या युगात घड्याळाच्या काट्यावर चालावं लागतं. अशात अनेक मुलींसाठी मेकअप म्हणजे जीव की प्राण होतो. त्यामुळे काही मुली ऑफीसला निघताना ट्रेनमध्ये केस विंचरतात किंवा मेकअप करतात. अशात या तरुणीने हे सगळं सोडून थेट स्ट्रेटनींग केलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Relationship Tips : महिलांच्या मनातलं कसं ओळखायचं?

Uddhav Thackeray Video: 'जय गुजरात'; नारा देताना उद्धव ठाकरेंचा जुना व्हिडिओ शिवसेनेकडून व्हायरल

Pandharpur : विठुरायाच्या पद स्पर्शासाठी ५ किमीपर्यंत लांबच लांब रांगा | VIDEO

Maharashtra Live News Update: भारंगी नदीत वृद्धाने घेतली उडी; घटना सीसीटीव्हीच्या कॅमेऱ्यात कैद

Hindi Language Row: आर्थिक गणित जुळवण्यासाठी व्यापाऱ्यांना त्रास, खंडणी नाही दिली म्हणून...; प्रताप सरनाईकांचे मनसैनिकांवर गंभीर आरोप|VIDEO

SCROLL FOR NEXT