Delhi Metro Viral Video: तरुणीच्या शेजारी बसून त्याने केलं घाणेरडं कृत्य; विकृत तरुणाचा VIDEO व्हायरल

तरुणीच्या शेजारी बसून त्याने केलं घाणेरडं कृत्य; विकृत तरुणाचा VIDEO व्हायरल
Delhi Metro Viral Video
Delhi Metro Viral VideoSaam TV
Published On

Delhi Metro Viral Video : दिल्ली मेट्रोचा आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुण अश्लील कृत्य करताना दिसत आहे.

दिल्ली मेट्रोतील हा व्हिडीओ (Viral Video) पाहून अनेक नेटकऱ्यांना आपला राग अनावर झाला आहे. त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. डीएमआरसीने (दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन) देखील या संदर्भात निवेदन जारी केले आहे.

डीएमआरसीने सांगितले की आम्ही प्रवाशांना विनंती करतो की त्यांनी मेट्रोमध्ये प्रवास करताना जबाबदारीने वागावे. इतर प्रवाशांनी असे आक्षेपार्ह वर्तन पाहिल्यास, त्यांनी कॉरिडॉर, स्टेशन, वेळ इत्यादी तपशीलांसह डीएमआरसी हेल्पलाइनवर त्वरित तक्रार करावी. (Latest Marathi News)

Delhi Metro Viral Video
Viral News: देसी जुगाड! तरुणीने तांदळाच्या पोत्यापासून तयार केली स्टायलिश हॅण्ड बॅग, Video होतोय व्हायरल

Delhi Metro Viral Video : चालत्या मेट्रोत तरुणाचे लज्जास्पद कृत्य

व्हायरल व्हिडीओमध्ये (Viral Video) हा तरुण मेट्रोच्या सीटवर बसलेला दिसत आहे. त्याच्या शेजारी एक मुलगीही बसली आहे. आजूबाजूला इतर प्रवासी आहेत. मात्र अत्यंत बेफिकीरीने हा तरुण अश्लील कृत्य करत आहे. त्याचे हे कृत्य पाहून काही प्रवासी उठून निघून जातात.

मात्र या तरुणाचे लज्जास्पद कृत्य सुरूच राहतं. घटनेच्या वेळी तो त्याच्या मोबाईलमध्ये  व्हिडिओ (Viral Video) पाहत असल्याचे दिसत आहे. तो पॉर्न क्लिप पाहत असावा, अशी शंका व्यक्त केली जात आहे.

Delhi Metro Viral Video
Viral Video: बाबो! गाडीसह तरुणाला घेतले डोक्यावर! सोशल मीडियावर 'स्प्लेंडर डान्स'ची होतेयं तुफान चर्चा; VIDEO पाहून चक्रावून जालं

हा व्हिडीओ ट्विटरवर पोस्ट करणाऱ्या व्यक्तीने सांगितले की, त्याने हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरून डाउनलोड केला होता. कम्युनिटी गाइडलाइनमुळे व्हिडीओ इन्स्टाग्रामवरून काढून टाकण्यात आला आहे. मात्र याआधीच अनेक लोकांनी हा व्हिडीओ डाउनलोड केला होता. त्यानंतर आता हा व्हिडीओ वेगवेगळ्या सोशल मीडिया  (Social Media) प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com