Delhi Metro Viral Video Saam Digital
व्हायरल न्यूज

Delhi Metro Viral Video : दिल्ली मेट्रोत 'राम आयेंगे...', तरुणाच्या आवाजाने अख्खी ट्रेन राम भक्तीत तल्लीन

Delhi Metro Viral Video: दिल्ली मेट्रो कायमच प्रवाशांच्या विविध घटनांमुळे फेमस होत असते.. यात एका तरूणाने थेट दिल्ली मेट्रोमध्ये भजन गायलं आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Ram Ayenge Song in Delhi Metro

दिल्ली मेट्रो कायमच प्रवाशांच्या विविध घटनांमुळे फेमस होत असते. प्रत्येक दिवशी दिल्ली मेट्रोमध्ये काहीनाकाही घटना घडत असतात,ज्यामुळे मेट्रो केद्रंबिंदू ठरते. व्हायरल होणाऱ्या घटना अशा असतात की प्रत्येकजण हैराण होऊन जातो.

कधी मुलांच्या स्कर्ट घालून एन्ट्रीने तर कधी कपलच्या रोमान्सने दिल्ली मेट्रो वादात सापडली आहे. आता दिल्ली मेट्रोचा आणखी एक व्हिडीओ समोर आला असून तो सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. यात एका तरूणाने थेट दिल्ली मेट्रोमध्ये भजन गायलं आहे. या व्हिडीओने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे.('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या दिल्ली मेट्रोच्या एका व्हिडिओने प्रत्येक नेटिझन्सची मनं जिंकली आहेत. या व्हिडिओमध्ये मेट्रोच्या सीटवर बसलेला एक तरूण प्रभू श्री रामाचे भजन गाताना दिसत आहे. तर दुसरा तरुण गिटार वाजवताना दिसत आहे. यात 'राम आएंगे तो अंगना सजाऊंगी' हे भजन गाताना दिसत आहेत.

सध्या भारतभर येत्या २२ जानेवारीच्या प्रभू श्री रामाच्या मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडणार असून या दिवशी श्रीरामलला मंदिरात विराजमान होणार आहेत. याचा उत्साह भारतीयांच्या मनात दिसून येत आहे.

याआधीही नवरात्रीच्या निम्मिताने काही तरूणांनी मेट्रोमध्ये भजन गाऊन वातावरणनिर्मिती केली होती.यादरम्यान मेट्रोमधील काही प्रवासी व्हिडीओ बनवण्यात व्यस्त असल्याचे दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवरील ritiksinger_07 या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ शेअर करत कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे की, ' दिल्ली मेट्रो #publicrelations.'

या व्हिडीओला हजारोंपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. हा व्हिडिओ पाहून एका यूजरने लिहिले की, 'दिल्ली मेट्रोचा हा व्हिडिओ खूपच अप्रतिम आहे. दुसर्‍याने लिहिले की, 'हा दिल्ली मेट्रोच्या आतील सर्वात आश्चर्यकारक व्हिडिओ आहे.' तिसर्‍याने लिहिले की,'आजचा सर्वोत्तम व्हिडिओ.' या व्हिडीओला नेटिझन्सनी चांगली पसंती दिली असून त्यांनी हा व्हिडीओ अनेक साईटवर शेअर करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मनमाड-इंदोर रेल्वे जमीन अधिग्रहण प्रकरणी बाधितांची रेल्वे अधिकाऱ्यांसोबत बैठक निष्फळ

Nitish Kumar : डॉक्टर महिलेचा हिजाब ओढणं पडलं महागात; मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याविरोधात FIR

Couples Tips: सुखी संसाराचं सिक्रेट समजलं, नवरा बायकोने रात्री झोपण्यापूर्वी या ५ गोष्टी नक्की करा

Famous Actress Death: 2025 मध्ये कोणत्या प्रसिद्ध अभिनेत्रींचे निधन झाले? संपूर्ण यादी

Maharashtra Politics: माणिकराव कोकाटेंना जमीन मंजूर पण आमदारकी जाणार? VIDEO

SCROLL FOR NEXT